
बांगलादेशसाठी टी२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम…
आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात २५ सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव केला.
या सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने मोठी कामगिरी केली आहे. त्याने आशिया कपच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध विकेट घेऊन इतिहास रचला आहे. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने टी२० मध्ये बांगलादेशसाठी १०० बळी टिपले आहेत. हा विक्रम करणारा तो बांगलादेशचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानला माघारी पाठवली. अहमदचा हा टी २० क्रिकेटमधील १०० वा बळी ठरला. टी२० क्रिकेटमध्ये किमान १०० फलंदाजांना बाद करणारा तो शकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांच्यानंतर तिसरा बांगलादेशी गोलंदाज ठरला आहे.
वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने फरहानला रिशाद हुसेनकरवी झेलबाद केले. त्यानंतर तस्किनने शाहीन आफ्रिदीला देखील माघारी पाठवले. तस्किनने त्याच्या शेवटच्या षटकात मोहम्मद नवाजला बाद करून सामन्यातील आपला तिसरा बळी टिपला. नवाज २५ धावांवर पव्हेलीयनमध्ये परतला.
दुबई येथे दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर २०२५ च्या आशिया कपमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाने नानेफक गमावून प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाने ८ विकेट्स गमावून १३५ धावा केल्या होत्या. हा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मर’ असा होता. या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेश संघाला केवळ १२४ धावाचा करता आल्या. परिणामी पाकिस्तान संघाने हा सामना ११ धावांनी जिंकला.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे
पाकिस्तान : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
बांगलादेश : सैफ हसन, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, झाकीर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान. महेदी हसन,तस्किन अहमद