
युक्रेनसोबतच्या युद्धात भारतीय…
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धाचा परिणाम फक्त या दोन देशांना नाही तर जवळपास सर्व जगाला सहन करावा लागतोय. भारताला तर या युद्धाची थेट झळ बसली असून भारतावर अमेरिकेने 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला.
भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावरही गंभीर आरोप केली जात आहेत. मात्र, अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतोय. भारत हा रशिया आणि युक्रेन युद्धासाठी जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही भारतावर करण्यात आला.
आता भारताने थेट रशियाविरोधात भूमिका घेतली असून मोठा इशारा दिलाय. रशिया हा युक्रेनसोबतच्या युद्धामध्ये भारतीय नागरिकांना झोकून देत असल्याचे म्हणते 27 भारतीय नागरिकांना रशियातून मुक्त करून भारतात पाठवा, असे भारताने म्हटले. या 27 भारतीय नागरिकांना रशियाने आपल्या सैन्यात दाखल करून घेतले होते. असाही आरोप आहे की, रशियाला व्हिसावर गेलेल्या नागरिकांना बळजबरीने सैन्यात दाखल करून घेत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, दिल्लीला समजले की, रशियाच्या सैन्यामध्ये भारतीय नागरिक सेवा देत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांनी माहिती दिली. आमच्या माहितीनुसार, 27 भारतीय नागरिक हे रशियाच्या सैन्यात सेवा देत आहेत. आम्ही या नागरिकांच्या कुटुंबाशी संपर्कात आहोत. आम्ही परत एकदा भारतीय नागरिकांना रशियाच्या सैन्यात सेवा देण्याविषयीच्या प्रस्तावापासून दूर राहण्यास सांगत आहोत. कारण तिथे खूप जास्त धोका आणि जोखिम नक्कीच आहे.
आम्ही मॉस्को आणि दिल्लीतील रशियाच्या दूतावासांसोबत यावर चर्चा केली. या भारतीय नागरिकांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 27 भारतीय नागरिकांना तिथून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. व्हिसावर गेलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थी यांना रशियाने आपल्या सैन्यात घेतले. युक्रेन विरोधातील युद्धात रशियाने बळजबरीने भारतीय नागरिकांना या युद्धात ओढल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी हा मुद्दा नरेंद्र मोदी यांनी उठवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैन्यात आता भारतीय नागरिकांची एकून संख्या 150 झाली असून युक्रेनच्या हल्ल्यात 12 भारतीयांचा जीव गेला.