
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष आपत्ती निवारण आणि नुकसान पंचनाम्यांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे.
यामुळे पंचनाम्यांना विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हे दौरे थांबवावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.पवारांच्या या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले,’दौरे केल्याशिवाय नेमकी परिस्थिती काय आहे हे लोकप्रतिनिधींना कळत नाही. परिस्थिती जाणून घेण्यासाठी बांधावर जावं लागतं. बांधावर गेल्यानंतरच लोकांची खरी परिस्थिती कळते. लोकांचे अश्रू दिसतात, लोकांची व्यथा समजते त्यातूनच आपण किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याबाबतचा अंदाज लावू शकतो.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सध्याची परिस्थिती ही राजकारणात करण्याची नसून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आहेत. त्यामुळे या परिस्थितीमध्ये कोणीही राजकारण करू नये. सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असून शेतकऱ्यांची पूर्णपणे मदत करणार असल्याचे, मराठवाड्यात जास्त नुकसान
पावसामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील नुकसानाचे प्रमाण जास्तमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यासह अनेक मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी नुकसानाची पाहणी केली आहे. या संकटाच्या परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभा आहे.
शेतकरी हिताचे निर्णय घेऊ…
शेतकरी आणि माय माऊलीच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे जबाबदारी सरकारची असून ती जबाबदारी सरकार नक्कीच पार पाडेल. ही जबाबदारी पार पाडताना काही अति शर्टी शिथिल करून, बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय हे सरकार घेईल.केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करण्यात येईल या संदर्भात केंद्राशी देखील चर्चा करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि मी याबाबत बोललो आहे. जेव्हा जेव्हा या पद्धतीचे मोठे संकट येतात तेव्हा केंद्र सरकार हे मदतीला धावून येत असतं. त्यामुळे यावेळी देखील केंद्राकडून आपल्याला मदत मिळेल असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.