
अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांना पकडलं कोंडीत !
राज्याला नेहमी कलंकित करणारे गृहराज्यमंत्री, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक कारनामे आपल्यासमोर ठेवले आहेत. एवढं होऊन देखील पुराव्यासकट सर्व प्रकरणं राज्याच्या जनतेसमोर, विधानपरिषदेच्या माध्यमातून सरकार समोर ठेवली.
मुख्यमंत्र्यांची अडचण माहीत नाही. पण त्यांनी प्रत्येकवेळी त्यांना पाठीशी घातलं. मंत्र्याने काही केलं तरी चालतं आमचं त्यांना अभय आहे. एकनाथ शिंदे यांनी खेडच्या सभेत सांगितलं की, योगेश तुझ्या पाठीशी मी आहे. तुला काळजी करायचं कारण नाही. जेव्हा राज्याचा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पाठी असण्याची भावना तयार झाल्याने गृहराज्य मंत्र्याने राज्यात जे थैमान घातले, त्याचा पुरावा एका चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या जनतेसमोर आला. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवार सुरू आहे. कोयता गँग आहे. पुणे जिल्ह्यात 70 गँग कार्यरत आहेत. खंडणी, खून, दरोडेखोरी, खुनाचे प्रयत्न हे प्रकार सर्रास घडत आहेत. हे करण्यासाठी जे लागत, म्हणजे सरकारचं पाठबळ आयतं मिळतं, हे सिद्ध झालंय” असं अनिल परब म्हणाले.
‘गृहराज्यमंत्री अर्ध न्यायिक जज असतो’
“योगेश कदम यांच्याकडे येण्यापूर्वी पोलिसांनी स्क्रूनिटी केली. त्यात पोलिसांनी अहवाल दिला. हा गुन्हेगारी पार्शवभूमीचा आहे. याचा भाऊ कुविख्यात गुंड आहे. याच्यावर पूर्वी गुन्हे दाखल होते. गुन्हे दाखल असताना तो कोर्टात सुटला. का तर हा गुंड असल्याने त्याने कोर्टात कुणाला येऊ दिलं नसेल. त्यामुळे पुराव्या अभावी त्याची सुटका झाली असेल. त्यामुळे पुराव्या अभावी झालेली सुटका म्हणजे गुन्ह्यातील निर्दोष मुक्तता नाही. पोलिसांनी त्याचा गुन्हा नाकारला. योगेश कदमकडे अपील आलं. अपीलमध्ये पोलिसांची बाजू मांडली जाते. सुनावणी घेतली जाते. हे अर्ध न्यायिक जज आहे. गृहराज्यमंत्री अर्ध न्यायिक जज असतो” असं अनिल परब म्हणाले.
ही लाखो रुपयांची कॅश आली कुठून?
अर्ध न्यायिक जजकडे सुनावणी होते. सुनावणीत दोन्ही बाजू मांडल्या जातात. पोलिसांनी जी बाजू मांडली त्यात हे सर्व आलं आहे. तरीही योगेश कदम यांनी जो निर्णय दिला त्यात हा माणूस किती सज्जन आहे. त्याला पैशाची ने आण करण्यासाठी शस्त्र आणण्याची गरज आहे. मोदींच्या राज्यात दोन लाखाच्या पुढे कॅश घेऊन जाण्याची परवानगी नाही. दोन लाखाच्यावर कॅश न्यायची असेल तर बँकेचं सर्टिफिकेट लागतं. आणि यांनी म्हटलंय मला लाखो रुपयांची कॅश द्यावी लागते. वाहतूक करावी लागते. ही लाखो रुपयांची कॅश आली कुठून ? असा सवाल अनिल परब यांनी विचारला.