
मी आता तज्ज्ञ झालो टॅरिफ…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत नोबेल शांतता पुरस्कारासाठी दावा करताना दिसले. मात्र, नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत ते कधी नसल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी मी जगातील आठ मोठी युद्धे रोखली आहेत, असा थेट दावा केला.
मला वाटते की, मी जगातील एका एकमेंव व्यक्ती आहे, ज्याने इतकी मोठी युद्धे रोखली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, मी काही युद्ध तर टॅरिफची धमकी देऊन रोखली आहेत आणि हजारो लोकांचे जीव वाचवले. धक्कादायक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे परत एकदा भारत-पाकिस्तान युद्धाबाबत दावा करताना दिसले. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी टॅरिफची धमकी देऊनच रोखले आहे. भारताकडून अगोदरच स्पष्ट सांगण्यात आले की, भारत-पाकिस्तान युद्ध रोखण्यात डोनाल्ड ट्रम्प यांची काहीच भूमिका नाहीये.
नुकताच बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, टॅरिफची धमकी दिली की युद्ध रोखतात. उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात मी म्हणालो होतो, जर तुम्हाला युद्ध करायचे असेल तर तुमच्याकडे अण्वस्त्रे आहेत. मी तुमच्या दोघांवर 100 टक्के किंवा 200 टक्के असा टॅरिफ लावेल. फक्त हेच नाही तर मी टॅरिफ (कर) लावत असल्याचेही त्यांना सांगितले. त्यानंतर हे युद्ध अवघ्या 24 तासांमध्ये थांबले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, पाकिस्तान युद्धादरम्यान मी नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि काही तासात युद्ध थांबले. भारताने वेळोवेळी सांगितले आहे की, डोनाल्ड ट्रम्प हे भारत-पाकिस्तान युद्धाबाबत करत असलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि व्दिपक्षीय बैठकीतून युद्धाबाबत निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानने मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर भाष्य केले नाही.
हमास आणि इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेने 20 कलमी प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव दोन्ही देशांनी मान्य केला असून ट्रम्प यांनी म्हटले की, हे माझे आठवे युद्ध असेल जे मी सोडवले आहे. मी ऐकले आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध चालू आहे आणि मी परत येईपर्यंत वाट पहावी लागेल. मग मी अजून एक युद्ध थांबवणार आहे आणि मी युद्ध रोखण्यात आता चांगलाच माहिर झालोय.