
अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबद्दल मोठा दावा म्हणाले…
मागील काही दिवसांपासून भारत-अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. मात्र, पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना दिसले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अगोदर भारतामध्ये प्रत्येक वर्षाला नेते बदलले जात.
पण माझे मित्र नरेंद्र मोदी बऱ्याच वर्षांपासून आहेत आणि ते खूप जास्त चांगले काम करत आहेत. पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प हे परत एकदा भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बोलताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत पाकिस्तानमध्ये परिस्थिती अधिक वाईट होती आणि तिथे चुकीच्या गोष्टी घडत होत्या. सात विमाने पाडली गेली होती आणि परिस्थिती अधिक बिघड जात होती. दोन्ही देशांना मी फोन करून स्पष्ट सांगितले की, हे युद्ध ताबडतोब थांबवा.
जर तुम्ही हे युद्ध थांबवले नाही तर मी मोठा टॅरिफ तुमच्या दोघांवरही लावेल. अमेरिका कोणत्याही प्रकारची व्यापार चर्चा दोन्ही देशांसोबत करणार नाही आणि तुमच्या ज्या वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत येतात, त्यावर 200 टक्के टॅरिफ लावणार आहे. करा तुम्हाला युद्ध करायचे आहे ना… त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण झाल्याचा दावा पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. पाकिस्तान देखील यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करताना दिसला आहे.
भारताने वेळोवेळी याबद्दल स्पष्टपणे म्हटले की, भारत-पाकिस्तान युद्धात कोणीही हस्तक्षेप केला नाही तर दोन्ही देशांनी व्दिपक्षीय करार करत हे युद्ध थांबवले आहे. गाझा शांतता शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी तिथे जाणे टाळले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राजदूत सर्जियो गोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल सांगितले की, मला वाटते की, खूप चांगली भेट राहिली. मोदी हे महान व्यक्ती आहेत. गोरने मला सांगितले की, पीएम मोदींना डोनाल्ड ट्रम्प आवडतात. मी भारताला अनेक वर्षांपासून पाहत आलो. भारत खरोखरच एक खास देश आहे. काही लोक भारतात काही दिवसांसाठी जातात आणि काही महिने तिथे राहतात.