
तेल खरेदीचा खळबळजक निर्णय; डोनाल्ड ट्रम्प यांच्या डावात…
डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल-हमास युद्धाबाबत मोठी घोषणा केली. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावा करून जगात खळबळ उडून दिली. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांसोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, रशियाकडून भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चिंतेत आहेत.
याबद्दल आमचे स्पष्ट म्हणणे आहे की, यामुळे रशियाला पैशांची फडिंग होत आहे. यामुळेच मला निराशा भारतावर होती ते रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने पुढे अत्यंत मोठा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत खात्रीपणे सांगितले आहे की, ते आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. खरोखरच हा मोठा निर्णय आहे.
पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आता आम्ही पुढे चीनला देखील हे करण्यासाठी म्हणावे लागेल. ऊर्जा धोरणांवर मतभेद असूनही पंतप्रधान मोदी हे माझे जवळचे मित्र आहेत. चीनसोबत असलेल्या तणावात आमचा भारतासोबत चांगला आणि महत्वपूर्ण व्यापार होईल. नरेंद्र मोदी माझे मित्र असून आमच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित आहे. रशियाच्या हल्ल्यात लाखो युक्रेनचे लोक मरत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर भारताकडून अजूनही कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. खरोखरच भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणारा का? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया-युक्रेन युद्ध थांबल्यानंतर भारत पुन्हा रशियाकडून तेल खरेदी करू शकतो, त्यामध्ये आमचा काहीही हस्तक्षेप नसेल पण आता नाही. आमचे स्पष्ट म्हणणे आहे की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर काही गोष्टी हे युद्ध रोखण्यासाठी सोप्या जातील.
नक्कीच ही प्रक्रिया इतकी सोपी नाहीये, त्याला वेळ लागेल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अमेरिकेने थेट 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेच्या टॅरिफनंतरही भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतोय. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे अधिकारी नेमके काय बोलतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.