बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय विभक्त होणार असल्याची सातत्याने चर्चा रंगताना दिसतंय.
मात्र, यावर बच्चन कुटुंबियांकडून भाष्य करणे कायमच टाळले गेले. पहिल्यांदाच आता ऐश्वर्या राय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर दिसलीये. दिवंगत आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासोबतच ऐश्वर्या राय देखील मंचावर उपस्थित होती. यापूर्वी कधीही नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर ऐश्वर्या दिसली नाही. ऐश्वर्या राय नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर दिसल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
ऐश्वर्या राय देखील सत्य साई बाबांची मोठी भक्त आहे. सत्य साई बाबांच्या सल्ल्यानुसार तिने आयुष्यातील अनेक मोठे निर्णय घेतले. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय आणि आई वृंदा राय हे देखील सत्य साई बाबांचे भक्त होते. 1991 मध्ये ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा तिने बाबांचे आशीर्वादही घेतले. हेच नाही तर अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी तिने सत्य साई बाबांचा सल्ला घेतला होता.
सत्य साई बाबांच्या सल्ल्यानंतरच तिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ऐश्वर्या राय आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभात पोहोचली होती. यावेळी तिने मनातील भावना देखील व्यक्त केल्या. ऐश्वर्याच्या आयुष्यात सत्य साई बाबांची एक वेगळी आणि खास जागा आहे. त्यामुळे ती आंध्र प्रदेशच्य कार्यक्रमात पोहोचली होती.
जया बच्चन समाजवादी पार्टीच्या खासदार असून त्या बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ऐश्वर्या राय भाषण करताना दिसली. यादरम्यान तिने सत्य साई बाबा यांचे स्थान तिच्या जीवनात नेमके काय आहे हे सांगितले. ऐश्वर्या राय भाषण करताना भावूक होताना देखील दिसली. नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित राहून ऐश्वर्याने मोठा धक्का जया बच्चन यांना दिल्याचे लोक बोलत आहेत.


