चायनाचा भयानक कट समोर; जगभरात खळबळ…
शांघाय सहकार्य संघटना (SCO) च्या शिखर परिषदेनंतर भारत आणि चीनमधील संबंध आता हळुहळु सुधारत असल्याचं पहायला मिळत आहे. याचदरम्यान आता अमेरिकन काँग्रेसची सल्लागार असलेल्या एका संस्थेकडून चीन आणि पाकिस्तानसंदर्भात खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली होती, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे ठिकाणं उद्ध्वस्त झाले होते. भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास शंभर दहशतवादी मारले गेले. भारतानं आपल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं.
दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारतानं या लढाईमध्ये आपल्या सुदर्शन आणि ब्रह्मोस सारख्या मिसाईलची ताकद जगाला दाखवून दिली. तर दुसरीकडे पाकिस्तानने भारतीय वायुदलाचे राफेल लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता.
आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकेकडून मोठा दावा करण्यात आला आहे, अमेरिकेकडून प्राप्त रिपोर्टनुसार पाकिस्ताने भारताचं एकही लढाऊ विमान पाडलं नसल्याची माहिती समोर आली आहे. तसचे या रिपोर्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, पाकिस्तानकडून भारताचं राफेल विमान पाडण्याचा जो दावा करण्यात येत आहे, त्यामागे एक मोठं कट कारस्थान होतं, चीनचा हा भारताविरोधातील डाव होता, चीनकडून भारताच्या राफेल लढाऊ विमानाला बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा दावा या संस्थेच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
यासाठी चीनकडून अनेक फेक सोशल मीडिया अकाऊंटस तयार करण्यात आले, पाकिस्तानचा हा दावा खरा ठरवण्यासाठी चीनने एआय तंत्रज्ञानाचा वापर केला, असा दावा देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे, हा रिपोर्ट समोर येताच जगभरात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने भारताचं एकही लढाऊ विमान पाडलं नाही, हा चीनचा कट होतो, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.


