फायरब्रँड महिला नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील मित्रपक्षातच जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातूनच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा जोरात रंगली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच आता पुन्हा एकदा शिंदे यांच्या शिवेसेनेत पुन्हा फूट पडणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या रणरागिनीने केला आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा असणारे उदय सामंत आपल्या जवळचा गट घेऊन कदाचित भाजपसोबत जातील अशी शक्यता आहे. त्यात काय प्रोब्लेम आहे? कारण आता संदीपान भुमरे, संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले हे नेतेमंडळी त्रस्त झाले आहेत. निश्चितपणे या सगळ्यांचा शिंदे यांच्यापेक्षा उदय सामंत यांच्याकडे कल असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल जो रंजकपट 2022 ला शिंदेंनी नाटकाचा पहिला अंक दाखवला होता, त्याचा दुसरा अंक आता सुरु आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचे राजकीय भवितव्य आणि त्यांची भिस्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कशी आहे, यावर या बातमीतून प्रकाश टाकण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यातील कथित शीतयुद्धामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.
उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे आणि भाजपसोबतच्या संभाव्य विलीनीकरणाच्या शक्यतेमुळे शिंदे गटात दुसऱ्यांदा फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वृत्तानुसार, ‘महाराष्ट्राच्या राजकारणातला जो रंजक पट आहे, २०२२ ला जे काही शिंदेंनी एक अंक नाटकाचा दाखवला होता, मला वाटतंय त्याचा दुसरा अंक आता सुरू आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
त्यासोबतच शिवसेना पक्ष फुटावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले माजी मंत्री संदीपान भुमरे, भारत गोगावले, संजय शिरसाट आणि दादा भुसे यांच्या सारखे नेतेही सध्याच्या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळेच या मंडळींचा कल उदय सामंत यांच्याकडे वाढत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा चांगलीच रंगली आहे.


