थेट म्हणाले तुम्हाला नाही जमत तर…
अमेरिकेच्या जवळ जणारा पाकिस्तान चीनला आपले खरे रंग दाखवू लागला आहे. चीनच्या प्रत्येक चलाखीकडे डोळेझाक करणाऱ्या पाकिस्तानने आता आपले डोळे उघडले आहेत. त्यामुळे चिनी कंपन्या अडचणीत आल्या आहेत.
पाकिस्तानच्या टॅक्स प्रमुखाने बुधवारी चिनी कंपन्यांना इशारा दिला. आपल्या प्रोडक्शनची पूर्ण डिटेल द्या किंवा पाकिस्तानात आपलं कामकाज बंद करा. चार चिनी कंपन्यांच्या एका प्रतिनिधीने संसदीय समितीला सांगितलं की, त्यांची मॅनेजमेंट टीम मॉनिटरिंग कॅमेरे लावण्याची परवानगी देणार नाही. कंपन्यांच्या प्रोडक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे आहेत. चिनी कंपन्या त्यासाठी परवानगी देत नाहीय. त्यावेळी पाकिस्तानने ही धमकी दिली.
सिनेटच्या स्थायी वित्त समितीच्या बैठकीत पाकिस्तानच्याफेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यूचे (FBR) चेअरमन राशिद लैंगरियाल यांनी चिनी कंपन्यांना इशारा दिला. टाइल बनवणाऱ्या कंपन्या कमी उत्पादन दाखवून दरवर्षी जवळपास 30 अब्ज रुपयांची टॅक्स चोरी करतात असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने सर्व सिरॅमिक कारखाने, स्थानिक असो वा परदेशी त्यांच्या प्रोडक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे (AI) कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे, असं लैंगरियाल यांनी सांगितलं.
चीनच म्हणणं काय? का कॅमेरे बसवू नयेत?
चार चिनी कंपन्यांचे प्रतिनिधी समितीसमोर हजर झाले. त्यांनी खासदारांना विनंती केली की, FBR ला कॅमेरा लावण्यापासून रोखा. पाकिस्तानी वर्तमानपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, बैठकीच अध्यक्षपद पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे (PPP) सिनेटर सलीम मांडवीवाला यांनी भूषवलं. प्रोडक्शनवर देखरेख ठेवण्यासाठी कॅमेरे लावल्यास त्यांचे सर्व ट्रेड सीक्रेट्स बाहेर येतील असा तर्क कंपन्यांनी मांडला. पण हा तर्क पाकिस्तानच्या टॅक्स प्रमुखांनी फेटाळून लावला. FBR ने आधीच चिनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. प्रत्येक फॅक्टरीत कॅमेऱ्यांची संख्या 16 ने कमी करुन 5 केली आहे. प्रोडक्शनची जिथे योग्य पद्धतीने मोजणी होईल, तिथेच हे कॅमेरे बसवले जातील असं FBR ने सांगितलं.
पाकिस्तानात टॅक्स चोरी एक मोठा मुद्दा
पाकिस्तानात टॅक्स चोरी एक मोठा मुद्दा आहे. पाकिस्तानात त्या कंपन्या सुद्धा टॅक्स चोरी करतात, त्या औपचारिक दृष्टया टॅक्स नेटमध्ये सहभागी आहेत. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने 18 सेक्टर्समध्ये कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हाय-रिस्क वाली ही सेक्टर्स आहेत.


