महाराष्ट्रातील मोठ्या पक्षाची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर !
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाच्या हालाचाली सुरू आहेत.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला 70 जागा देण्याची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय, दरम्यान या फॉर्म्युलावर वरिष्ठ नेत्यांमध्ये प्राथमिक सहमती झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. अशातच मनसेची साथ सोडा आणि आमच्यासोबत या… महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला डायरेक्ट मोठी ऑफर दिली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला ही ऑफर दुसऱ्या कुणी नाही तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने दिली आहे. मुंबईसाठी कॉग्रेसने शिवसेना UBTला ऑफर दिली आहे. मनसेची साथ सोडा आणि आमच्यासोबत या अशी कॉग्रेसच्या वरिष्ठ सुत्रांची माहिती आहे. कॉंग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार करेलही, मात्र अटी-शर्ती लागु असतील असे देखील सूत्रांचे म्हणणे आहे.
मविआ सोडून ठाकरेंनी मनसेसोबत नवी चुल मांडली, त्यावेळी कॉग्रेसला विश्वासात घेतले नाही म्हणून काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. कॉंग्रेस शरद पवारांसह कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय यांचीही मोट बांधण्याच्या तयारीत आहे. निवडणूकीआधी उद्धव ठाकरेंशी काँग्रेस हायकमांड चर्चा करेल मात्र, आता माघार न घेण्यावर मुंबई कॉंग्रेस ठाम असल्याची सुत्रांची माहिती आहे. मनसेसोबत जाण्यास काँग्रेसने स्पष्ट नकार दिलाय. मारहाणीची भाषा करणा-यांसोबत जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे.तर उद्धव ठाकरेंशी कोणतंही बोलणं झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे.त्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस हायकंमाडसोबत संपर्कात असल्याची माहिती आहे. मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसनं स्पष्ट नकार दिलाय. मात्र निवडणुकीत फाटाफूट झाल्यास तोटा होऊ शकतो असा युक्तीवाद करत उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ठाकरेंच्या एका नेत्यानंही वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.


