यूबॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या तब्येलबद्दल विविध चर्चा या रंगल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा उडाली होती. मात्र आता त्यांना जगाचा निरोप घेतला आहे. धर्मेंद्र यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे लाखोंमध्ये त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांना माहिती न देताच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता होती. मात्र खालील एका कारणामुळे त्यांच्या निधनाची बातमी लिक झाली.
या गोष्टीमुळे धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी लिक झाली
आज सकाळी धर्मेंद्र यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावेळी त्यांच्या घरासमोर रुग्णवाहिका आली होती. जर ही रुग्णवाहिका घरासमोर आली नसती तर कदाचित त्यांच्या निधनाची बातमी लिक झाली नसती. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या निधनाची माहिती दिली जाण्याची शक्यता होती. मात्र घरासमोर रुग्णवाहिका आल्यामुळे धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समोर आली.
धर्मेंद्र यांना 6 मुले
धर्मेंद्र यांना दोन पत्नी असून 6 मुले आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नावे प्रकाश कोर तर दुसऱ्या पत्नीचे नाव हेमा मालिनी आहे. प्रकाश कौर यांना चार मुले तर हेमा मालिनी यांना 2 मुले आहेत. 6 मुले तर 13 नातवंडे असा मोठा परिवार धर्मेंद्र यांचा आहे. धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौरशी पहिले लग्न केले. त्यांना चार मुले झाली. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल ही त्यांची नावे आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या दोन मुली आहेत. ईशा देओल आणि अहाना देओल. ईशाने आई वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये काम केले. मात्र दुसरी मुलगी चित्रपटांपासून दूर आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतले अंत्यदर्शन
धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आमिर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार हे बॉलिवूड सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले होत. त्यामुळे या परिसरात पोलीसांचा मोठा फौजफाटा पहायला मिळाला.


