तुमच्या १० खात्यांच्या मंत्र्याला !
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने भाजपा आणि इतर सत्ताधारी पक्षांवर काडडून टीका करत असतात.
विशेषतः त्यांनी मत चोरीच्या मुद्दा देखील लावून धरला आहे. नुकतेच रोहित पवारांनी जामनेरमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी झालेल्या गोंधळावरून टीका किली होती झाला.यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना टोला लगावला होता.
आमदार रोहित पवार आजोबांच्या मांडीवर, कडेवर बसून पहिल्यांदा आमदार झाले होते. दुसर्यांदा काकांनी (अजित पवार) दुर्लक्ष केल्याने त्यांचा पोस्टल मतांवर जेमतेम विजय झाला. आणि आता ते आम्हाला अक्कल शिकवायला निघाले आहेत, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना हाणला . यानंतर आता रोहित पवारांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
जामनेरमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठा गोंधळ झाला. एका उमेदवाराला भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बळजबरी माघारीसाठी पकडून आणत असल्याची चित्रफित सगळीकडे फिरली. यानंतर रोहित पवारांनी महाजन यांच्या राजिनाम्याची मागणी केली होती.
रोहि पवारांनी केली होती राजीनाम्याची मागणी
“भाजापचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती! बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा! दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा,” अशी टीका रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केली होती.
महाजन काय म्हणाले?
या पार्श्वभूमीवर, बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना भुसावळमधील सभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपचा एक साधा कार्यकर्ता इथपर्यंत सहजपणे पोहोचलेला नाही. आम्ही इतक्या वर्षांपासून जनतेची कामे करत आहोत. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. जनतेने उगाच नाही आम्हा पती-पत्नीला सात ते आठ वेळा निवडून दिले. लोकांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतो. जामनेरमध्ये माझ्या समाजाची मते फक्त तीन हजार आहेत. इतर समाजाचे लोक आम्हाला कामांच्या जोरावर निवडून देतात. तुमच्यासारखे आजोबांच्या आणि काकांच्या पुण्याईने आम्ही राजकारणात आलेलो नाही, असेही मंत्री महाजन हे आमदार पवार यांना उद्देशून म्हणाले.
रोहित पवारांचे प्रत्युत्तर
दरम्यान रोहित पवारांनी महाजन यांची टीका करतानाची व्हिडीओ क्लिप शेअर करत प्रत्युत्तर दिल आहे. “गिरीश महाजन साहेब, बाबांच्या खांद्यावर कडेवर खेळायला नशीब लागतं आणि आम्ही नाशिबवान आहोत आम्हाला पवार साहेबांसारखे बाबा (आजोबा) लाभले. बाकी तुमच्या १० खात्यांच्या मंत्र्याला २०१९ मधे ४० हजारांनी लोळवलं होतं, यावेळी पण तोच डाव होता पण तुम्ही #VoteChori केली,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.
असो, तुम्हाला आणि मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या सभेत विकासावर बोलण्यापेक्षा माझ्यावर टीका करावी लागते यातच कर्जत-जामखेडचं राजकीय वजन महाराष्ट्रात वाढल्याचं दिसून येतं. बाकी, धार्मिक भावनांच्या नावाखाली आपण करत असलेलं पैसा आणि सत्तेचं राजकारण आणि नाशिक कुंभमेळ्यात आस्थेच्या नावाखाली टेंडर्स फुगवून करत असलेल्या करामती याचा आम्ही योग्य वेळी भांडाफोड करूच…! असा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे.


