सोशल मिडिया पोस्टवरुन मोठा वाद !
टीम इंडिया सध्या अडचणीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत बरोबरी सोडा, सिरीज गमावण्याचं संकट आहे. हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. ते माजी क्रिकेटपटुंच्या रडारवर आहेत.
टीमच्या सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खराब प्रदर्शनामुळे टीम इंडियावर वाईट वेळ ओढवली आहे. या कठिण परिस्थितीत विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. विकास कोहलीने उपरोधिकपणे टीमवर निशाणा साधला. “आधी आपण परदेशात सुद्धा जिंकण्यासाठी खेळायचो. आता आपल्या घरात मॅच वाचवण्यासाठी खेळतोय. जेव्हा विनाकारण तुम्ही बॉस बनण्याचा प्रयत्न करता, आधीपासून व्यवस्थित सुरु असलेल्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करता तेव्हा असच होतं” असं विकास कोहलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. नंतर त्याने ती पोस्ट डिलिट केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडिया हा कसोटी सामना गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. पहिला कोलकाता येथील कसोटी सामना भारताने 30 धावांनी गमावला. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 288 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवस अखेर भारताची वाईट अवस्था झाली. दुसरा डाव आफ्रिकेने 260/5 धावांवर घोषित केला. भारताने दुसऱ्या डावात दोन विकेट गमावले आहेत. आज टीम इंडियाला विजयासाठी 522 धावांची गरज आहे. आज कसोटी सामना ड्रॉ झाला, तरी मालिका दक्षिण आफ्रिकेचीटीम 1-0 ने जिंकेल.
गौतम गंभीर यांच्या नावावर होईल या खराब कामगिरीची नोंद
ही सीरीज 0-2 ने हरलो, तर मायदेशात दोन कसोटी मालिका गमावणारे गौतम गंभीर भारतीय टेस्ट इतिहासातील पहिले कोच बनतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत चार पैकी दोन कसोटी मालिका भारताने मायदेशात गमावल्या आहेत. एकूण 18 कसोटी सामन्यापैकी 7 टेस्ट जिंकल्या आहेत. 9 मध्ये पराभव झालाय. दक्षिण आफ्रिकेची टीम फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते आहेत. भारताच्या जुन्या कमकुवत बाजू समोर आल्या आहेत. फॅन्स निराश आहेत. विराट कोहलीच्या कॅप्टनशिपचे जुने दिवस आठवत आहेत. त्यावेळी टीम इंडिया मायदेशात चॅम्पियन होती.


