गुप्तचर अहवालाने मोठी खळबळ थेट पैसा,हत्यार…
मुस्लिम देशांना हाताशी धरून मोठा कट भारताच्या विरोधात रचला जात आहे. नुकताच खळबळ उडवणारी माहिती पुढे आली. गेल्या काही दिवसांपासून तुर्की पाकिस्तानला मदत करताना दिसतोय. यामुळे तुर्कीवर विश्वास ठेवणेही शक्य नाही.
भारताच्या विरोधात भयंकर कट रचला जात आहे. शेख हसीना यांचे सरकार बांगलादेशातून गेल्यानंतर बांगलादेश देखील भारताच्या विरोधात भूमिका घेत आहे. गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेशच्या इस्लामिक कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामीला तुर्की मोठी फंडिंग करत आहे. भारताविरोधात कारवाया करण्यासाठी यांची मदत घेतली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या गुप्त एजन्सीने ढाकाच्या मोघबाजारमध्ये जमात-ए-इस्लामीचे नवीन ऑफिस तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे.
हेच नाही तर सादिक कय्यामने तुर्कीची यात्र केली. तुर्कीचे राष्ट्रपति तैयप एर्दोगन दक्षिण आशियातील इस्लामिक संघटन मुजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बांगलादेशचे इन्वेस्टमेंट डेवलपमेंटचे अथॉरिटी चीफ आशिक चाैधरी तुर्कीला गेले होते. हेच नाही तर त्यांनी शस्त्र कारखान्याचा दाैराही केला. त्यांनी काही बैठकाही तिथे केल्याची माहिती मिळतंय. तुर्की दक्षिण आशियाई देशांमध्ये वर्कशॉप करून स्कॉलरशिप वाटून कट्टरता वाढवण्याचे काम करत आहे.
इस्लामिक संस्थांवर तुर्की खूप जास्त खर्च करतोय. जिहादी विचार वाढवण्याचे काम केले जातंय. तुर्की ज्याप्रकारे कट्टरपंथी संघटनांना पाठबळ देतंय. त्यावरून त्रिपुरा, मिझोराम, मेघालय यासारखी राज्य प्रभावित होण्याची शक्यता आहे. तुर्की पैशांसोबत शस्त्र देत जिहादी विचार पसरवत आहे. केरळमध्ये यापूर्वीच एजन्सी होती. गुप्त माहितीनुसार, तुर्की आयएसआयला पैसा पुरवत आहे.
मुळात म्हणजे तुर्कीला बांगलादेशला हाताशी धरून भारताविरोधात मोठे आव्हान तयार करायचे आहे आणि दहशतवाद पसरवायचा आहे. तुर्कीचा डाव भारतीय गुप्तचर यंत्रणाच्या लक्षात आला असून भारताकडून सावध भूमिका घेतली जात आहे. हेच नाही तर तुर्कीचा पाकिस्तानलाही मोठा सपोर्ट आहे. पाकिस्तान देखील तुर्कीची साथ देत आहे. यामुळे मोठे आव्हान भारतापुढे उभा आहे. भारतातील वातावरण खराब करण्याचा संपूर्ण कट या मुस्लिम देशांचा आहे.


