राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तारखांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. उद्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे. राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत.
स्थानिक पातळीवरची समीकरणे पाहून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बऱ्याच ठिकाणी युती म्हणूनही लढले जात आहे. बदलापूर नगरपरिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बहुचर्चित बदलापूर नगरपरिषद निवडणूक होताना दिसतंय. त्यामध्येच आता तिसरी आघाडीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. पाच उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेत महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या तिसरी आघाडी या संस्थेच्या सात उमेदवारांनी भाजपाला दिला पाठिंबा दिला आहे. ऐन निवडणुकीत या संस्थेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, संस्थेकडे निवडणूक चिन्ह नसल्याने ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवीत होते. अचानक कविता सकट, वैभव सदाफुले, मंगेश इंगळे, रुपेश साळवी ,प्रफुल कांबळे या पाच उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
पाचही जण हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नसून त्यांच्यात तिसरी आघाडी होती. त्यामुळे या संस्थेकडे चिन्ह नसल्याने आम्ही त्यांना मशाल चिन्ह दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत या पाचही उमेदवारांना महाविकास आघाडीच्या मतदारांनी मतदान करू नये, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष किशोर पाटील यांनी केले आहे.
आता यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल असे किशोर पाटील यांनी म्हटले आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना राज्यात मोठ्या घडामोडी घडताना सध्या दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी आपली ताकद लावली जात आहे. आरोप प्रत्यारोपाचे सत्रही चांगलीच रंगताना दिसत आहे. आता या निवडणुकीमध्ये कोणाचे वर्चस्व राहते हे बघण्यासारखे ठरेल. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल आणि 3 डिसेंबर 2025 रोजी निकाल लागेल.
