विजयकुमारजेठे खेड तालुका प्रतिनिधी -:राज्याच्या अनेक भागांत वातावरणात अचानक बदल होत असून अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुका राजगुरुनगर परीसरात ही दुपारी चारच्या दरम्यान आकाशात ढगांचे दाटलेले वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि थंड वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सध्या रब्बी हंगामातील गहू व कांदा ही पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत,अशा वेळी अवकाळी पाऊस झाल्यास गव्हाच्या कणसांवर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तसेच कांदा पिकाला ओलाव्यामुळे कुज येण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकरी बांधवांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. शक्य असल्यास पिकांवर ताडपत्री आच्छादन, निचऱ्याची व्यवस्था आणि औषध फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान खात्याकडून पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आ बसवाहन करण्यात आले आहे.
