दैनिक चालु वार्ता व्रतसेवा
फुले – आंबेडकर जयंती समारोह समिती गावागावात दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यांना माझे व्यक्तिगत मत कळवतो की, सर्वप्रथम भारत देशाच्या आयुष्यमान बहुजन समाज बांधवांना कोटी कोटी क्रांतिकारी जय भिम व १३५ व्या जयंती निमित्त सर्वांचे स्वागत तसे पाहता हा एप्रिल महिना म्हणजे अनेक साधुसंत, थोर पुरुष महामानव यांच्या जयंतीचा असल्याने जयघोष असतो पूर्वी या जयंतीचा उत्सव अंबावडे कुटुंबापासून तर आंबेडकर कुटुंबापर्यंत होता या जयंतीची पूर्वपिटिका अशी की, सर्वप्रथम १९२८ ला पुणे येथील जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रथम जयंती साजरी केली ती ९८ वर्षापूर्वी आज देश विदेशातील कोट्यावादी बांधव जयंती उत्सव हर्ष उल्हासाने साजरा करतात मग ही जयंती साजरी कशाप्रकारे करायची तर नेहमीप्रमाणे नाचून नव्हे तर वाचून करावी मागील वर्षापासून भारत सरकारने १४ एप्रिल हा दिवस समानता दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत महापुरुषांचे विचार समाजापर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे तरुणांनो तुम्ही या देशाचे नागरिक म्हणून विकसित भारत नवे स्वप्न नवी दिशा समाजाला देणार की नाचणार हे सर्व मी आपणास माझ्या अनुभवानी सांगतो आहे मित्रांनो परत परत सांगतो की, वाजागाजा बँड बाजा ढोल ताशा करायचा नाही त्या ऐवजी ११ एप्रिल ते १५ एप्रिल जयंती परिसर स्वच्छ करा, पताका रोशनी आकर्षक सजावट, निळे ध्वज, पंचशील ध्वज, लावून सजावट करा शांततेच्या उत्साहाच्या आनंदी वातावरणात रॅली काढा या पाच दिवसाच्या विविध कार्यक्रमात मुला मुलींचे गीत गायन भाषण स्पर्धा नाटक एक पात्री प्रयोग महापुरुषांच्या ऐतिहासिक प्रसंगावर दृश्य सजावट करा बॅनर लावा प्रचारक प्रबोधनकार बौद्ध भिक्षू थेरो महाथेरो यांना निमंत्रित करा, प्रबोधन व गायन एकाच दिवशी ठेवू नका भाषणात टीका टिपणी न करता महापुरुषाचे विचार मांडा इतरांनी आपला आदर्श घ्यावा असे वर्तन करा अशा प्रकारच्या कार्यक्रमात अनाठायी खर्च कळेल, संस्थेचा पैसा वाचेल सोबतच विहारात अभ्यासिका उघडण्यास प्राधान्य द्यावे पुढची पिढी वाचत राहील खर्चच करायचा आहे तर खारा, बुंदी पाकीट, तयार करून पाण्याची पाऊच वाटा, भोजन द्या, गावोगावी ठिकठिकाणी अशाच प्रकारच्या जयंतीची अपेक्षा करूया जय भीम – जय भारत – नमो बुद्धाय
गुलाबराव नेवारे
धम्म प्रचारक तथा भारतीय बौद्ध महासभा वर्धा जिल्हा संघटक रा. साहूर तालुका आष्टी जिल्हा वर्धा
