
दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोतीकदम
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद संचलित ही संस्था कोव्हिड लसीकरण मोहिमेअंतर्गत गावागावांमध्ये जाऊन पथनाट्याद्वारे जनतेला लसीकरणाचे महत्त्व समजावून देत आहेत.लोकांच्या मनातील लसीकरणाबाबतच्या ज्या काही मनामध्ये संभ्रम होता तो दूर सारून लसीकरणाचे महत्व ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष सर्वांनाच समजावून सांगण्याचे काम पथनाट्याद्वारे गावागावांमध्ये केले जात आहे. या संस्थेने लोहा तालुक्यात जनापुरी,सोनखेड, शेवडी,मडकी, या गावांमध्ये पथनाट्याद्वारे लसीकरण मोहीम जनजागृती केली आहे .पथनाट्य सादरकर्ते शाहीर अरविंद खंदारे ,नितेश ठाकूर ,प्रकाश शिंदे, शितल बोरगे, पूजा शिंदे ,यांनी या कलाकारांनी पथनाट्य यामध्ये सहभाग घेतला आहे. समाजामध्ये जनजागृतीचे कार्य ते करत आहेत याचे नियोजन तालुका समन्वयक चंद्रभागा शिंदे, जिल्हा समन्वयक मुकेश श्रीवास्तव सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र सोनखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आली सर ,एमपी डब्ल्यू कल्याणकर सर , गच्चे सर ए.एन. एम .कोमल गोडबोले, आशा कार्यकर्ती देवुबाई मोरे ,सोनखेड येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य , व अनेक प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते एकंदरीत covid-19 लसीकरण जनजागृती पथनाट्याद्वारे अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण होत आहे आणि जनतेतुन लसीकरणलाअतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमामुळे लोक लसीकरणाकडे वळत आहेत.