
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
(आमदार एकडे यांच्या हस्ते 7 कोटी 50 लक्ष रुपये किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न )
नांदुरा: दि.८. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण विकास कामावर भर दिला असून त्यामुळे अडीच वर्षाच्या काळामध्ये मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू लागला आहे येणाऱ्या काळात यापेक्षा दुपटीने विकास कामे करण्यात येऊन मतदारसंघाचा शाश्वत विकास केल्याशिवाय राहणार नाही कारण मतदारसंघाचा कायापालट करणे हीच आपली विकास पूर्तीची संकल्पना असल्याचे मलकापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश एकडे यांनी वडनेर भोलजी येथील भूमिपूजन समारंभ सभेत प्रतिपादन केले. दिनांक 8 मे रोजी डिघी येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे रुपये 10 लक्ष , डिघी ते वडनेर जवळ पुलाचे बांधकाम करणे, वडनेर ते चांदुर रस्त्यावर उर्दु शाळेजवळ पुलाचे बांधकाम करणे, वडनेर ते निंबोळा रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे रुपये दोन कोटी 50 लक्ष, वडनेर येथे सभागृहाचे बांधकाम करणे रुपये 10 लक्ष, बुर्टी येथे स्मशानभूमी शेड उभारणे रुपये 5 लक्ष , पिंपरी आढाव येथील काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण रुपये 5 लक्ष , कोकलवाडी येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे रुपये 5 लक्ष , मेंढळी येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे रुपये 5 लक्ष, कोकलवाडी ते मेंढळी ते जवळा बाजार रस्त्याच्या लांबीची सुधारणा करणे रुपये 4 कोटी 50 लक्ष , बेलुरा येथील अंतर्गत कॉंक्रीट रस्त्याचे लोकार्पण व व्यायाम शाळेचे उद्घाटन रुपये 10 लक्ष रुपये अशा असे एकुण रुपये 7 कोटी 50 लक्ष विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आमदार राजेश एकडे यांचे हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डीघी येथे डीघी ग्रामपंचायतचे सरपंच सौ लताताई विठ्ठल लांडे, वडनेर येथे वडनेर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ ललिताबाई संतोष दिघे. पिंर्पी अढाव येथे पिंपरी अढाव ग्रामपंचायतचे सरपंच अशोक देवचंद अढाव , कोकलवाडी येथे कोकलवाडी ग्रामपंचायत चे सरपंच भगवान भाऊ भगत, मेंढळी येथे मेंढळी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ केशरबाई एकनाथ शेंड काळे तर बेलुरा येथे बेलुरा ग्रामपंचायत च्या सरपंच विनायक नथुजी इंगळे उपस्थित होते या भूमिपूजन सोहळा प्रसंगी श्री पद्म रावजी पाटील मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा, श्री संतोष राव पाटील जिल्हा परिषद गटनेते, वसंतराव जी भोजने उपजिल्हा प्रमुख शिवसेना, विजय सिंग राजपूत माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मोहन रावजी पाटील जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, भगवान भाऊ धांडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, श्री निलेश पाउलझगडे सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी, संजय चोपडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, नितीन बापू देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य, गजानन राव लांडे शिवसेना नेते, अनंतराव लांडे राष्ट्रवादी काँग्रेस नेते, सदाशिवराव लांडे काँग्रेस नेते, अब्दुल हाफिज शेख मुन्शी माजी पंचायत समिती सदस्य , अजमत बेग मिर्झा उपसरपंच वडनेर, सविता राजेंद्र सुरडकर उपसरपंच डिगी, संजय सिंग जाधव माजी पंचायत समिती सदस्य,केशवराव मापारी माजी सभापती पंचायत समिती, आर के जाधव प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती, अनिल धनोकार प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती, बंडूभाऊ शिंगोटे, सौ सत्यभामाबाई कमलाकर धनोकार,दिलीप आढाव ,संदीप बोचरे , संजय अढाव ऋषिकेश देशमुख, तुळशीराम भगत (माजी सरपंच), रवींद्र भगत(मा संचालक ख.वि.स.नांदुरा), प्रल्हाद पाटील(शिवसेना नेते), पुरुषोत्तम भगत(माजी सरपंच),संतोष भगत (ग्रा.प.सदस्य),प्रदीप भगत (तंटामुक्ती अध्यक्ष), नीलकंठ भगत (ग्रा.प.सदस्य) रामेश्वर भगत (ग्रा.प.सदस्य)संदीप भगत (ता.अ.रा.यु.काँग्रेस) जयप्रभु भगत(ग्रा.प.सदस्य) विनोद रणीत (ग्रा.प.सदस्य) विनोद अढाव ,सौ. मंदोदरीबाई पंढरी घनोकार , सौ. सत्यभामाबाई कमलाकर घनोकार
सौ. तिलीमाबाई सुरेंद्र घनोकार , योगेश विनायक खरादे ,सौ. शुधमतीबाई प्रकाश घनोकार ,रामेश्वर देविदास घनोकार , सौ. संगिताबाई प्रविण तांगडे सदस्य,विष्णू भाऊ, ज्ञानदेव घनोकार,सौ प्रतिभावाई शिवदास धनौकार,सौ. सिमाबाई विनोद मेहेंगे संतोषभाऊ डिघे रामेश्वर पाटील कैलास पाटील पुरुषोत्तम हिवाळे ,देविदास भालेराव ,रुपेश ठाकरे ,जनार्धन पा बोचरे परमेश्वर भगत छत्रघून हागे,बाळकृष्ण बोचरे संतोष दांडगे निलेश वाघ पंकज बोचरे आत्माराम शंकर धनोकार सुरेश निनाजी धनोकार राजेश सारंगधर घनोकार सदानंद सोमाजी इंगळे पंढरी ज्ञानदेव घनोकार विनोद रामदास मेहेंगे मुकुंदा श्रीराम घनोकार आनंदा शत्रुघ्न घनोकार राजेश मनिक राव शिंगोटे जगन्नाथ प्रल्हाद शिंगोटे सुरेश जगदेव शिंगोटे महादेव विश्वनाथ शिंगोटे गजानन महादेव शिंगोटे अशोक शंकर डिवरे सरपंच जवळा बाजार प्रमोद एकनाथ सेंडकाळे गणेश सुभाष घनोकार प्रल्हाद रामभाऊ गवारे गोविंदा शिवाजी घनोकार लक्ष्मण रामभाऊ धनोकार तसेच गावातील नागरिक उपस्थित होते..!!