
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपूर प्रतिनीधी-बाळासाहेब सुतार
सुरवड तालुका इंदापूर येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की मी आनेक वृत्तपत्रात वाचले आहे हा पक्ष मुस्लिम धर्माच्या विरोधात नाही किती खोटे बोलायचे तुम्हाला मी प्रामाणिक पणाने सांगतो कि जरा विचार करून पहा राज्यांमध्ये किती प्रकारे जातिवाद दंगली चालल्या आहेत किती प्रकारचे भाषणे चालू आहेत भोंगा वाजला काय नाही वाजला काय तर कोणाचेच पोट भरणार नाही रे बाबांनो धर्माचे कोठेतरी जातीयवादाचे राजकारण करायचे हिंदू-मुस्लीम मध्ये भेदभाव करून भांडायला लावायचं काही लोकांचे काही पक्षाचे काम सुरू आहे. म्हणूनच आपण इथून पुढे कोठेतरी सावध राहिले पाहिजे राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
शुक्रवारी तालुक्यातील 45 कोटी 43 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर सुरवड येथील जाहीर सभेमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा आध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, तालुका आध्यक्ष हानुमंतराव कोकाटे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागरबाबा मिसाळ, श्रीमंत ढोले सर, प्रशांत पाटील, अभिजित तांबिले, दीपक जाधव, सुरेश शिंदे, आतुल झगडे, सतीश पांढरे, बापू शिंदे, दत्तात्रेय तोरसकर, यांच्यासह आनेक मान्यवर व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले की जाती-धर्माचे राजकारण केले जाते मुस्लिम व हिंदू मध्ये भेदभाव केला जातो भांडणही लावायचे काम केले जाते तालुक्यातून मुस्लीम आसो आथवा हिंदू आसो आपण सर्वजण एकच आहे. एखाद्याचे खायचे दात वेगळे व दाखवण्याचे दात वेगळे यापासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आसे स्पष्ट विचार घेऊन राज्यमंत्री बोलत होते.
जुन्या लोकांचा आपल्यावर विश्वास आहे परंतु कोणी निधी दिला कोणी उलट सुविधा निर्माण करून दिल्या याचाही विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्याची बंधारा दुरुस्तीची मागणी होती. खासबाग मधून पावणे दोन लाख रुपये निधी मंजूर केला.
सोलापूर साठी पाइपलाइनद्वारे पाणी गेले तर नरसिंहपूर परिसरातील नदीपात्रात पाणी साठवून राहिले पाहिजे. यासाठीही आपण पाऊल उचलले पाहिजे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उद्गार,
या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाआध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,
श्रीमंत ढोले सर, अभिजीत तांबिले, दीपक जाधव, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरवड येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित राहून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा यांचे आभार व्यक्त केले.
————————————–