
दैनिक चालू वार्ता वडेपुरी प्रतिनिधी- मारोती कदम
लोहा तालुक्यातील आंबेसांगवी येथील शिवसंभा पंडितराव कदम हे सामाजिक ,शैक्षणिक ,धार्मिक, सामाजिक, कार्यात सदैव लोहा तालुक्यात दिनदुबळ्यांचे कामे करीत असतात, आणि याचे फलित म्हणून सवित्री महीला मंच नांदेड संचालिका अरुणा मॅडम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सावित्री गौरव पुरस्कार शिवसंभा कदम यांना देण्यात आला .त्यांचा नांदेड येथील कुसुम सभागृह मध्ये सपत्निक सत्कार करण्यात आला .यावेळी प्रमुख पाहुणे अनिलजी मोरे साहेब,कवी प्रा. उद्धव ढाकणीकर सर,माऊली दापशेडकर, राम पाटील व अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते, शिवसंभा पाटील यांचे मी मराठी एकीकरण समिती मराठवाडा संपर्क प्रमुख म्हणून सुद्धा मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याकरता खूप योगदान आहे ,आणि याचे फलित म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला असेच अनेक पुरस्कार त्यांना जीवनामध्ये मिळावेत अशी गावकऱ्यांच्या वतीने सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक, यांनी त्यांना या पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या आणि सर्वत्र सगळीकडे शिवसंभा पाटील कदम यांच्या या पुरस्काराचे कौतुक होत आहे आणि त्यांना जीवनामध्ये असेच अनेक पुरस्कार मिळावेत अशी सदिच्छा लोहा तालुक्यातून सर्व मान्यवर मंडळी त्यांना शुभेच्छा देऊन करताहेत .खरोखरच त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या या कार्याची दखल सवित्री महीला मंच नांदेड च्या संचालिका अरुणा मॅडम आणी सावित्री महिला मंचने घेतली आणि त्यांचा सपत्नीक सत्कार कुसुम सभागृह नांदेड येथे झाला ,आणि त्यांना अशीच पुरस्कार जीवनामध्ये प्राप्त व्हावेत असेच कार्य समाजसेवेची चालू रहावे हीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मंडळीकडून सदिच्छा व्यक्त होत आहे.