
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार काल एका कार्यक्रमात बोलत होते. पुण्यात अनेकवेळा आम्ही अनेक जागा जिंकल्या. पण मला अजून लक्षात आलं नाही की गिरीश बापट कुठेही उभे राहतात अन निवडून येतात असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. एकदा गिरीष बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही अशी आठवण देखील पवार यांनी सांगितली. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्या ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट अनेक मान्यवरांच्या सोबत उपस्थित होते.
एक गंमती जमतीचा, आठवणीचा असा हा आजचा सोहळा आहे. महापालिकेत काम करताना अनेक गंमतीदार किस्से घडतात असे शरद पवार म्हणाले. तसेच पुण्यात एक GAS कंपनी होती. गिरिश-अंकूश-शांतीलाल, ती फार प्रसिद्ध आहे हेही ते सांगायला विसरले नाही.