
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी सलमान-नसिम अत्तार
(ये तो इक रस्म-ए-जहाँ है जो अदा होती है
वर्ना सूरज की कहाँ सालगिरह होती है)
बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त धाड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्याम भाऊ ऊमाळकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे होते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती श्री भानुदास राऊत हे होते. सदर शिबिराचा लाभ धाड परिसरातील जवळपास दोनशे पंधरा गरजू रुग्णांनी घेतला त्यापैकी चाळीस रुग्णांचे डोळ्यांचे ऑपरेशन करण्याचे ठरले. दिनाक 11/5/2022 रोजी त्यांना डॉक्टर उल्हास पाटील हॉस्पिटल जळगाव येथे घेऊन जाणार आहेत व सर्व रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जवळपास 50 लोकांचे ईसीजी व टू डी इको करण्यात आले. त्याचबरोबर अस्थीरोग इतर आजारांचे सुद्धा या वेळी निदान करून त्यांना मोफत औषधी वाटण्यात आल्या.
सदर कार्यक्रमांमध्ये सुनील मेहर सरपंच चांडोळ, शिवाजी देशमुख उपसरपंच चांडोळ, शेख अजीम सरपंच ढालसावंगी, अभिमन्यु तायडे उपसरपंच धाड, महेंद्रजी बोर्डे, निसार चौधरी माजी सभापती पंचायत समिती बुलढाणा, सागर शेठ जयस्वाल, संजय सोनुने सरपंच जाब, विनायक पाटील वाघ सावळी, डॉक्टर शिंदे साहेब, विष्णू फेफाळे, राजू वाघ, नटराज गवळी, मोहम्मद रईस, मोहम्मद शफीक, दिलीप खांडवे ,शंकर खांडवे, सय्यद अली चाचा, पशशू सेठ, सय्यद नसिर, वाहिद खान माजी सरपंच ढालसावंगी, फारुख भाई, राजदार खान माजी सरपंच, प्रदीप तायडे, बबन कानडजे, प्रवीण वागले, आणि धाड जिल्हा परिषद सर्कल मधील संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते नेते उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाचे आयोजन बुलडाणा जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहम्मद रिजवान सौदागर तथा पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर पाटील वाघ यांनी केले होते.