
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- वसंत आवटे
औरंगाबाद जिल्ह्यातील रांजणगाव येथील मातोश्री नगर येथील रहिवासी नंदू दगडू नागरे वय 36 धंदा मजुरी असून रवी उमेश गायकवाड यांच्याकडून चार वर्षापूर्वी दहा हजार रुपये घेतले होते त्या पैशाच्या कारणावरून आपापसात मतभेद झाला होता रवी यांनी पैसे मागितले असतात नागरे यांनी सांगितले की मी तुमचे पैसे सर्व दिले आहे रवी व त्याचे साथीदार यांनी लाकडी काठीने मारहाण केली आहे व जीवे मारण्याची धमकी दिली आहे नंतर घटनास्थळी पोलिस आले असून त्यांना घाटी रुग्णालय येथे ऍडमिट केले असून एमायडीसी वाळूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.