
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी-रामेश्वर केरे पाटील
औरंगाबाद ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांची शिल्लेगांव पोलीस ठाण्यात सोमवार दि.9 रोजी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या आदेशाने बदली करण्यात आली असून शिल्लेगांव पोलीस ठाण्याला सुरवसे हे सिंघम ठरणार आहे. मावळते पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्याकडे जिल्हा वाहतूक शाखेचा चार्ज देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी गंगापूर पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक असताना खून प्रकरणे अवैध धंद्यांवर चाप बसविला असून चोऱ्या गुन्हेगारीला आळा घातला असून जिल्हा वाहतूक शाखेला असतात वाहतूकीचे विविध प्रश्न मार्गी लागून रात्री गस्तीच्या वेळी दारु,गुटखा यांसारख्या चोरीच्या मार्गाने वाहतूक करत असलेल्या मुद्देमालांवर धडक कारवाई केली.शिल्लेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना नक्कीच आळा बसेल हे मात्र नक्की.