
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
विक्की गार्डन मध्ये १९९२ च्या शालेय विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
शाळेतील माॅनिटरच्या निवडणूकीपासून राजकारणाचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे मी जि.प.ची निवडणूक लढवून ती जिंकून जिल्हा परिषदेचा शिक्षण व बांधकाम सभापती झालो असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कराळे यांनी केले.
लोहा येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील १९९२ च्या विद्यार्थ्यांनी पारडी येथील विक्की गार्डन मध्ये एक दिवस हायस्कूलचा मैत्री फाऊंडेशन लोहा अंतर्गत ३१ वर्षांनंतर घडवून आलेला शिक्षक मित्र- मैत्रीणीचा स्नेह मिलन व भेट सोहळा कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण व सर्व मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी १९९२ च्या बॅच चे तात्कालीन व आताचे सेवा निवृत्त मुख्याध्यापक कृ.भा. जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून १९९२ च्या बॅचला शिकविलेले व आता सेवा निवृत्त झालेले शिक्षक शेंडगे सर,बेजगमवार सर, शिंदे सर,दळवे सर, वसमतकर सर,कोटगिरे सर , वायगावकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम सरस्वती व श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रामास सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृ.भा.जाधव सर सहित सर्व मान्यवरांचा सत्कार १९९२ च्या एस एस सी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी केला.
तसेच सर्व वर्ग मित्र व मैत्रीणीने एकमेकांचे पुष्पहार घालून स्वागत केले विचारपूस केली गप्पा गोष्टी लहान किस्से विनोद यात रंगाले.
सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर भाषणाचा कार्यक्रम झाला यावेळी बोलताना १९९२ च्या बॅचचे विद्यार्थी तथा आताचे धुरंधर राजकारणी नांदेड जि.प.चे माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कराळे पुढे बोलताना मी ज्या वेळेस शाळेत होतो तेव्हा मी माॅनिटरची निवडणूक लढविलो तेव्हा मला दोन मते मिळाले व तेथून मला राजकारणात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले मी शाळेत अभ्यासात कच्चा विद्यार्थी होतो पण मी राजकारणात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून सर्वांच्या आशिर्वादाने जिंकलो नांदेड जिल्हा परिषदेचा शिक्षण व बांधकाम खात्याच्या सभापती झालो .मी शिक्षण सभापती झाल्यानंतर आमचे वर्ग मित्र संतोष गुंडरे हे शिक्षक आहेत त्यांनी अनेक शिक्षक मित्राचे कामे घेऊन माझ्याकडे आले ते मी केलो .आजचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम अतिशय चांगला ठेवला असून त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी झाल्या असे संजय पाटील कराळे म्हणाले.
तसेच यावेळी नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण यांनी ही मनोगत व्यक्त केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले मी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी काशिनाथ शिरसिकर सर म्हणाले की,१९९२ च्या बॅच मधील विद्यार्थी हे आज आज शिक्षक, अधिकारी,, व्यापारी पत्रकार आदी झालेत व यात संजय पाटील कराळे व नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण यांनी राजकारणात आपला ठसा उमटविला असुन ते भविष्यात आमदार होतील असे काशिनाथ शिरसिकर सर म्हणाले.
तसेच यावेळी सकाळी नाष्टा दुपारी स्वादिष्ट स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेऊन मनोरंजनासाठी लक्ष्मीबाई वर्मा यांचा गायनाचा कार्यक्रम (ऑर्केस्ट्रा) ही ठेवण्यात आला होता.
तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृ.भा. जाधव सर, शेंडगे सर आदीची भाषणे झाली.
यावेळी १९९२ च्या बॅचचे विद्यार्थी माजी जि.प. सभापती संजय पाटील कराळे, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, पत्रकार मुर्तुजा शेख, पत्रकार संजय कहाळेकर, शिक्षक संतोष गुंडरे, पंकज चक्रावार, गोविंद फाजगे संजय चव्हाण , शिवाजी पवार , विष्णू आंबेकर, हरीकांत शिंदे, धनंजय कोटलवार, संतोष गडडम, तुकाराम मुगरे , ज्ञानोबा सोनवळे, रमेश शिंदे, अरुण पवार, त्रिंबक मटके, नामदेव कल्याणकर , अनिरुद्ध आळंदे, लिंबाजी डाके,दिलीप कहाळेकर,संजय काटकर, बालाजी पिटलेवाड, रंगनाथ पंदलवाड, विद्यार्थ्यांनी विजया मोटरवार, सुरेखा क्षीरसागर, अर्चना किलजे, अर्चना देवके , डॉ.सिमा गोलंदाज, सुषमा कोटगिरे, मिरा खवळे, कल्पना पवार,अरूणा चव्हाण,अनिता येरमवार , गोदावरी कटकमवार, वैशाली घंटे, सविता वसमतकर, स्वाती अवधूतवार, प्रज्ञा पाटील, सविता केंद्रे, चंद्रकला पवार,आशा सुतारे,मुनी शेटे, यांच्या सह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.