
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : शहरातील विमानतळावर तिबेट एअरलाइनच्या एका प्रवासी विमानाला भीषण आग लागली. उड्डाण घेताना विमान घसरल्याने ही आग लागल्याचं सांगितलं समोर येत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, तिबेट एअरलाइन्सचं विमान TV9833 पश्चिम चीनमधील चाँगकिंग जिआंगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण करत असताना ही आग लागली घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसारक सीसीटीव्हीनुसार, गुरुवारी सकाळी पोस्ट केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये चाँगकिंग जिआंगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी भागावर तिबेट एअरलाइन्सच्या विमानातून आग आणि काळा धूर निघताना दिसत आहे.
तिबेट एअरलाइन्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की सर्व 113 प्रवासी आणि नऊ क्रू सदस्यांना बाहेर काढण्यात आलं आहे.