
दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी – माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील गऊळ येथिल रहिवासी तथा नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ. रामचंद्र दत्तात्रय हेंडगे गऊळकर यांच्या हस्ते कंधार व नांदेड येथिल रुग्णांची सेवा तसेच लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड येथे मागील 5 वर्षा पासून 12000 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पूर्ण केल्या बद्दल दि. 7/05/22 रोजी त्यांच्या कार्यांची दखल घेऊन लायन्स नेत्र रुग्णालय तर्फे सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील गऊळ सारख्या खेडे गावातून अत्यंत हालाखीच्या परिस्थिती शिक्षण घेऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण भागातील जनतेतील नाळ जुळली असल्यामुळे गोरगरीब जनतेची सेवा करणे हे पहिले कर्तव्य समजून राज ऑप्टिकल कंधार येथे रविवारी तालुक्यातील रुग्णांची सेवा करत असुन त्यांनी त्यांच्या वैद्यकीय सेवेत आजपर्यंत विक्रमी 12000 नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण केल्या त्यांच्या कार्याची दखल घेवुन लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड येथे गौरव करण्यात आले त्यांच्या या यशाबद्दल राज ऑप्टिकल कंधार व अनेकांने शुभेच्छा दिल्या .