
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -किशोर वाकोडे
दि.१३.आप’ने महाराष्ट्रात पक्षविस्ताराचे धोरण राबवायला सुरुवात केल्याचे चित्र पहायला मिळतंय
सध्या महाराष्ट्रासह देशातील राजकीय वातावरणात बदलांचे वारे वाहत आहे. राजकीय घडामोडींमुळे चर्चांना उधाणं येत आहेत.दरम्यान, आता आम आमदी पार्टीकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली, पंजाबनंतर आता ‘आप’ने महाराष्ट्रात पक्षविस्ताराचे धोरण राबवायला सुरुवात केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अगामी पालिका निवडूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्याचे घोषित केल्यानंतर ‘आप’ महाराष्ट्रातील एक बड्या नेत्याला लवकरच राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली आहे. हा बडा नेता विदर्भातील आणि त्यातही उद्योगपती, राजकारणाचा दीर्घ अनुभव असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून आम आदमी पार्टीला प्रयत्न करुनही महाराष्ट्रात पाया रोवता आलेले नाहीत. परंतु आता एका माजी खासदाराला राज्यसभेत पाठवल्याने महाराष्ट्रात ‘आप’ची सकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते, असा विश्वास पक्ष प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाटतो आहे. केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी नुकतीच या नेत्याची चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
काल (गुरुवार) राज्यसभेच्या १५ राज्यातील ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात पंजाबमध्ये काँग्रेसच्या अंबिका सोनी आणि शिरोमणी अकाली दलाचे बलविंदर सिंग भुंदर यांची खासदारकीची मुदत संपत आहे. या दोन्ही जागा आता आम आदमी पक्षाकडे जाणार आहेत. त्यासाठी ‘आप’कडून ‘शक्तिशाली’ उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एका नेत्याला आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याची आम आदमीची तयारी सुरु आहे.
समाजाला हिंसक बनवण्याचा BJP अन् RSS चा प्रयत्न, सावंतांची टीका
आम आदमी पक्षाने दिल्लीपाठोपाठ पंजाब जिंकल्यानंतर त्याचा फायदा त्यांना राज्यसभेत झाला आहे. सध्या आम आदमीचे ८ खासदार राज्यसभेवर आहेत. यात दिल्लीतून ३ खासदारांची वर्णी लागली आहे. आपचे नेते संजय सिंग, श्रीनारायण दास गुप्ता आणि सुशीलकुमार गुप्ता यांचा यामध्ये समावेश आहे. तर पंजाबमधून यापूर्वी ५ खासदार निवडून गेले आहेत.