
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी -प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
महाराष्ट्रासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये व विविध तालुक्यात स्वराज्यरक्षक धर्मभूषण धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात आला छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी वयाच्या अगदी चौदाव्या वर्षी बुधभुषणम हा ग्रंथ लिहून ऐतिहासिक नोंद केली त्याच छत्रपती राजे संभाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याचा पहिला राजपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज व राणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव म्हणून स्वराज्याची धुरा अतिशय धुरंधर पणाने व जबाबदारीने पार पडली छत्रपती संभाजी राजे भोसले यांना स्वराज्य रक्षक धर्मवीर युद्ध धुरंधर अशा विविध उपायांनी संबोधले जाते अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यात तालुक्यात अतिशय थाटामाटात साजरा करण्यात आला.
त्याच अनुषंगाने कंधार तालुक्यातील दिग्रस बुद्रुक या गावी संपूर्ण गावकर यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती सोहळा संपन्न झाला याप्रसंगी मारोती गवळे , संजय पाटील होनराव , प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव , सहशिक्षक सतीश सोपानराव यानभुरे , कान्हा चमरगोर , साईनाथ शिंदे , रघुवीर वडजे , श्रीराम वडजे , किरण वडजे , हनुमंत वडजे , गोविंद सोनटक्के , कृष्णा बनसोडे , परमेश्वर शिंदे , बाळु वडजे , अनुराग बोरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.