
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
दोन वर्षाच्या करोनाच्या महामारी आणि मंडळाचे आधारस्तंभ शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै . मा . श्री . दिलीप जोशी सर यांच्या निधनानंतर श्री शाहू क्रीडा मंडळाने प्रथमच व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 5 मे ते 14 मे 2022 या कालावधीत केले होते . सरांच्या काळात पन्हाळा हा गड म्हटलं तर हॉलीबॉल हे समीकरण ठरले होते.तीच परंपरा या मंडळाने पुढे ठेवली आहे. सरांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण केले .पन्हाळा व कोल्हापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतात केले होते. तेच काम आता अशाप्रकारे शिबिर घेऊन पन्हाळा चा हाच वारसा पुढे नेण्याचे काम शाहू क्रीडा मंडळ पन्हाळा व सर्व पदाधिकारी व जेष्ठ खेळाडू करत आहेत . व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर हे दहा दिवस आयोजित केले होते . यावेळी प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक श्री . सुहास आडनाईक , श्री . सौरभ गोसावी , श्री . मुंतझर मुजावर व श्री . धन्वेंन्द्र मेडसिंग , शिवतेज लोहार, या सर्व राष्ट्रीय खेळाडूंनी प्रशिक्षणाचे काम केले . पन्हाळा बांधरी तील या प्रशिक्षणासाठी पन्हाळा , आपटी , नेबापूर , सोमवार पेठ , गुडे , निकमवाडी , बांबरवाडी , देवाळे या ग्रामीण भागातून 7 ते 18 वयोगटाच्या एकूण 55 खेळाडूंचा सहभाग होता . प्रशिक्षण कालावधीत मुलांना रोज व्हॉलीबॉल बरोबर , सूर्यनमस्कार , योगा , प्राणायाम , मेडीटेशन , शिस्त , आरोग्याचे महत्व असा सर्वांगीण विकास करण्यावर तसेच सकस पोषक नाष्टा देण्याचा शाहु क्रीडा मंडळ प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आज सांगता समयी पन्हाळा नगरपरिषद पन्हाळा चे मुख्याधिकारी मा . श्री . स्वरूप खरगे व शाहू क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व जेष्ठ खेळाडू उपस्थित होते . हे सर्व करत असताना सरांची शिकवण व आशिर्वाद च्या जोरावर तसेच पालकांनी दिलेल्या विश्वासावर नव्या उमेदीने शाहू क्रीडा मंडळाची वाटचाल सुरू ठेवत आहे, यामध्ये आपणा सर्वांची साथ व मार्गदर्शनाच्या जोरावरच पन्हाळ्याचा व्हॉलीबॉल विकास शक्य आहे , ते असेच नेहमी सहकार्य कायम आमच्या पाठीशी राहिल यात शंका नाही . कै . मा . श्री . दिलीप जोशी सरांच्या पश्चात आम्ही सर्व आजी माजी खेळाडू सरांनी घालून दिलेला व्हॉलीबॉलचा वारसा असाच चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भविष्यात अशाच सहकार्याची अपेक्षा आपणा सर्वांकडून व्यक्त करत आपणा सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो असे.मत मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पराग जोशी , सुभाष गवळी दिलीप दळवी अवधूत भोसले,,यांनी विचार मांडले