
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश नामदेव माने
=========================आज दिनांक 16 मे 2022 रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध स्मारक समिती जालनाच्या वतीने जालना शहरात मोती तलाव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2560 वी जयंती साजरी करण्यात आली, व नियोजित गौतम बुद्ध स्मारकाच्या जागेवर बौद्ध वंदना व पुष्पवर्षाव कार्यक्रम करण्यात आला होता ,यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर उपस्थित होते.या कार्यक्रमात श्री खोतकर यांनी भगवान बुद्धाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व मार्गदर्शन उपस्थितांना मार्गदर्शन केले,की आपण सर्वांनी भगवान गौतम बुद्धाचे विचार आत्मसात करण्याची गरज असुन त्यांनी सांगितल्या प्रमाणे मानसाने फक्त नेहमी दुसऱ्या चा चांगला विचार करावा,
दुसऱ्याबरोबर चांगले वागावे, त्यांच्याबद्दल चांगले बोलावे.एवढे जरी आत्मसात केले तर याचा परिणाम म्हणून तुमचे नक्कीच चांगले होईल.एवढा एकच गुण
आत्मसात केला तर जीवनात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.तसेच मोतीतलाव भगवान गौतम बुध्दाचे स्मारक व्हावे ही गोष्ट आपली पहिली मागणी असुश यासाठी प्रयत्नशील आहोत यासाठी लागणारे सहकार्य करण्यात येईल.याप्रसंगी जयभिम सेनेचे सुधाकरभाई निकाळजे,कवी प्रा.जयराम खेडेकर, दादाराव लहाणे,अँड बबनराव मगरे,गंगाधर तिवरे,सुनील साळवे, धनसिग सुर्यवंशी, रवी जगधने,दशरथ तोंडुळे,सुनील रत्नपारखे,सौ. पवार यांच्या सह जालना शहरातील नागरिक व गौतम बुद्धाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.