
दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी-संभाजी गोसावी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनीमीकारक पोस्ट लिहिणाऱ्या मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधांत सातारा शहर पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यांत आला. त्यामुळे सातारा पोलीस हे केतकी चितळे हिला अटक करण्यांची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुंमित्रा जाधव यांनी याबाबत फिर्याद दाखल केली सातारा येथे दिनांक 9 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब हे सातारा जिल्हा दौर्यावर आले होते.ता जकातवाडी सातारा येथे एका कार्यक्रमाप्रसंगी जवाहर राठोड या कवीच्या पाथरवर या कवितेचे निरूपण पवार साहेबांनी आपल्या भाषणांतून दिले त्याच अनुषंगाने मराठी अभिनेत्री केतकी चितळे पवार यांच्याबद्दल सोशल मीडियांवर वादग्रस्त पोस्ट केली. त्याच अनुषंगाने जिल्हाध्यक्ष सुंमित्रा जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली असता त्यामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार दिनांक 14 मे रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी कार्यालयात असताना मोबाईलवरुन केतकी चितळे यांनी पवार साहेबांची बदनामी केल्याचे दिसून आले तिच्या पोस्टमुळे वेगवेगळ्या जाती,धर्मात प्रादेशिक, गटात समाजांत तेवढे वाद निर्माण होऊ शकतात तसेच सामाजिक शांतता धोक्यांत येण्यांची शक्यता आहे. म्हणून माझी तिच्याविषयी तक्रार आहे यांच्या फिर्यादीवरुन सातारा शहर पोलिसांनी केतकी चितळे यांच्या विरोधांत आयपीसी १५३अ५०२,५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यांत आला याचा तपास पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले करीत आहेत.