दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी- नामदेव तौर
परतूर औरंगाबाद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ५ ते ७ मे दरम्यान नांदेड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत परतूर येथील तहसील कार्यालयात कार्यरत असणारे कृष्णा सोनवणे यांनी उंच उडी या क्रीडा प्रकारात द्वितीय पारितोषिक मिळविले आहे. नांदेड वाघाळा शहर मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पदक देऊन सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलिस निरीक्षक प्रमोद शेवाळे
