दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
पुणे जि. नारायणगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मित्रांच्या भावजय बरोबर प्रेमसंबंध प्रस्थापिंत करण्यासांठी अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन मंदिरांच्या पुजारी असलेल्या मित्रांनेच मित्रांचा खून केला.असल्यांचे पोलीस तपासांत उघड झाले खुनांच्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन संभाजी बबन गायकवाड वय 44 यांचा खून केल्याप्रकरणी येणेरे ता. जुन्नर येथील पिंटू उर्फ रामदास तुकाराम पवार वय 40 याला पोलिसांनी अटक केली. संभाजी गायकवाड रामदास पवार हे दोघेही जिवलग मित्र होते. रामदास पवार हा येथील मीना नदीच्या काठावर असलेल्या हरेश्वर मंदिरात स्वयंघोषित पुजारी म्हणून काम पाहत होता. तर संभाजी गायकवाड हा जागरण गोंधळ घालण्याचे काम करीत होता काही दिवसांपूर्वी संभाजी गायकवाड यांचे त्यांच्या भावजय बरोबर अनैतिक संबंध असल्यांची माहिती पवार यांना मिळाली होती. पवार याला सुद्धा भावजय बरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यांची इच्छा झाली होती. मात्र या कामात संभाजी गायकवाड याचा अडथळा निर्माण होत होता त्यामुळे शुक्रवारी दिनांक 13 मे रोजी दुपारच्या सुमारांस पवार यांनी संभाजी गायकवाड यांचा खून केला त्यानंतर पवार हा फरार झाला आरोपीचा शोध घेण्यासांठी स्थानिक गुन्हे शाखा नारायणगांव पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. पण आरोपी आंबेगाव तालुक्यांतील जंगल भागांत लपून बसल्यांची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि आरोपीला अटक करण्यांत पोलिसांना यश मिळाले सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखांली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार गणेश जगदाळे, सनय धनवे, हवालदार दिपक साबळे आदीं पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
