
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
जास्तीत जास्त युवक – युवतीने लाभ घ्यावा -श्रीनिवास मोरे
लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदार संघातील मौजे सोनखेड येथे काँग्रेस पक्षाचे नांदेड दक्षिण चे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निती निकेतन सेवाभावी संस्था व सोनखेड सर्कल कमिटीच्या वतीने दि. २३- ५-२०२२ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बाजार मैदान सोनखेड येथे नौकरी महोत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यांचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य श्रीनिवास मोरे यांनी केले आहे.
सध्या स्पर्धेचे युग असुन सरकारी नोकरी मिळणे फार कठीण होऊन गेले आहे दिवसेंदिवस बेरोजगारी संख्या वाढत आहे त्यामुळे बेरोजगारी दूर करण्यासाठी युवक – युवतींना नौकरी मिळविण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून बेरोजगारां च्या हाताला काम मिळावे म्हणून
काँग्रेस पक्षाचे नांदेड दक्षिण चे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निती निकेतन सेवाभावी संस्था सोनखेड व सोनखेड सर्कल काँग्रेस पक्षाच्या वतीने नौकरी महोत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यात बजाज ग्रुपच्या कंपनीत १०, १२ वी पास किंवा नापास व आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यां साठी नौकरी ची संधी उपलब्ध करून दिली आहे.
तेव्हा या संधीचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा व सोबत आधार कार्ड शैक्षणिक कागद पत्रे २ प्रती ४ पासपोर्ट फोटो घेऊन यावे व अधिक माहिती साठी राठोड सर मो.नं.९६५७९२५३ ३०, सातपुते सर मो.नं.७४९८५८३५५२, पाटील सर मो.नं.९०११६५००७४, सुरनर सर मो.नं.९९२२२३८४००
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्य श्रीनिवास मोरे यांनी केले आहे.