
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
ता. शहादा येथील सखाराम जहांग्या मोते व अखिल भारतीय आदिवासी बारेला समाज यांच्या वतीने तक्रारदार म्हणून पोलीस कर्मचारी – पोलीस मुख्यालय, नंदुरबार वे कमलसिंग सत्तरसिंग जाधव तथा के. डी. गावीत माध्यमिक विदयालय, येथील माध्यमिक शिक्षक बखतसिंग सत्तरसिंग जाधव व त्यांचे भाऊ चुनिलाल दगा जाधव यांचे विरोधात त्यांनी बेकायदेशीररित्या प्राप्त केलेले बोगस जात वैधता प्रमाणपत्र व त्याआधारित सरकारी नोकरी प्राप्त करून घेवून आदिवासी समाजाचे नुकसान केले व ते हिंदू पाटील असतांना त्यांनी पावरा या अनुसूचित जमातीशी संलग्न असल्याचा बनाव रचून खोटे कागदपत्र शासन दप्तरी सादर करून आदिवासींचे लाभ प्राप्त केले व पर्यायाने शासनाची तथा आदिवासी समाजाची देखिल ठगवणूक करीत असल्याने श्री. सखाराम जहांग्या मोते यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार याकडे अॅड. जगदिश कुवर यांमार्फत तक्रार दाखल करून त्याअनुषंगे सुनावणी होवून वरील तिन्ही लोकांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून म. समितीने कलम १० व ११ अन्वये कारवाईचे आदेश देखिल देवून तक्राररदार यांचे लाभात निर्णय पारीत केलेत.
सदरहु तक्रारदार मार्फत अॅड. जगदिश पी. कुवर यांनी माहितगार विधिज्ञ म्हणून काम केले असून त्यांना अॅड.भगतसिंग पाडवी यांनी सहकार्य केले.