
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पंतप्रधान स्व. राजीव गांधी
राजीव गांधी मरण पावला
भारत देशाचा सूर्य हरपला…!!धृ!!
दू्ष्ट दिन तो मंगळवार आला
संधी मिळाली कुण्या वैऱ्याला
बाॉंब स्पोट केला राती दहाला
राजा अमुचा धरणीवर लोळला…!!१!!
जवळ होते भारताचे शूर
ते ही गेले राजा बरोबर
देशभर वार्ता वाऱ्यावानी
जनता सारी आली धावूनी
ऐकूण हत्या राजाची,भारत हळहळला..! २!!
गरीबांचा गेला राजा कैवारी
दु.खी जहाली जनता सारी
घात पात झाला क्षणात रे
कुठे निजला होता देवा तू रे
आमुच्या नयनी ,दुखाचा पाझर फूटला…!!३!!
राष्ट्र अन् देशाचे नेते हो आले
राजीव गांधी जिंदाबाद दिधले
शांत ,संयम नेता थोर हो हरपला
जोडून कर राजीवजीं गांधीला
कवी सरकारानं ,प्रणाम हो केला…!!४!!
कवी सरकार इंगळी ता हातकणंगले