
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी.
वाई पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मधून दिनांक १९ मे रोजी फिर्यादी आत्माराम मारुती गाढवे रा. बोंंपर्डी ता. वाई जि.सातारा वाई पोलीस ठाण्यांत आपली दिनांक १८मे रोजी दुपारच्या सुमारांस बोपर्डी गावच्या हद्दीतून त्यांच्या घरासमोर लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर गाडी नंबर एम. एच 11एफ ६३१७ ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यांत दाखल केली होती पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब भरणे यांनी सदरचा गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलिसांना आरोपीच्या शोध घेण्याबाबत व गुन्हे या संदर्भात सूचना देऊन तपास कामी पथक रवाना केले असता. सदर गुन्ह्याचा तपास चालू असता श्री बाळासाहेब भरणे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय मिळालेल्या माहितीवरुन सदर गाडी चोरणारा इसम हा वाई एम आय डी सी व परिसरांत फिरत असल्यांची माहिती मिळाली त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस कर्मचारी व बोपर्डी ग्रामस्थांच्या मदतीने सदर आरोपी गाडीसह पकडले असता. आरोपीस विश्वासांत घेऊन विचारपूस केली असता त्याने वाले ,पुरंदर, पुणे वाई येथून मोटरसायकल गाड्या चोरल्यांचे असल्याचे पोलिसांना सांगितले त्यानुसार तपास करुन सदर आरोपीकडील चार मोटारसायकली हस्तगत करण्यांत पोलिसांना यश मिळाले. सदर आरोपीचे नाव गणेश धर्माजी कळंबे रा. बोपर्डी ता वाई जि. सातारा आरोपीकडूंन एकूण ८५.००० रुपये किमतींच्या एकूण ४ मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा.अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक मा.अजित बोहाडे वाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस कर्मचारी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मा. विजय शिर्के, महिला पोलीस नाईक सोनाली माने , पोलीस नाईक शिवाजी वायदंडे, पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर ,अमित गोळे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.