
दैनिक चालू वार्ता कलंबर प्रतिनिधी- हनमंत शिरामे
भोपाळवाडी फाटा :- येथील नांदेड बिदर हायवे बायपास रोडचे उदघाटन श्री. मारोतीराव निवृत्तीराव पाटील घोरबांड अध्यक्ष समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर, मा. सरपंच कलंबर खुर्द यांच्या हस्ते नारळ फोडून बाह्यवळण रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. बर्याच दिवसापासून भोपाळवाडी फाटा येथील रहदारीला त्रास होत होता. एकदम टर्न अरुंद रस्ता असल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. हे लक्षात घेऊन प्रशासनाने आज कामाला सुरुवात केली.सामाजिक कार्यकर्ते श्री.शंकर पाटील घोरबांड यांच्या शेतातून हा रस्ता गेला आहे.यावेळी प्रशासकीय अधिकारी, गुत्तेदार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.