
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
लव्हेंडरच्या लागवडीने जम्मू आणि काश्मीरमधल्या अंदाजे 5,000 शेतकरी आणि तरुण उद्योजकांना दिला रोजगार
नवी दिल्ली : भद्रवाह हे देशातील कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअपना मोठा वाव असलेले ठिकाण असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. देशातील पहिल्या ‘लव्हेंडर फेस्टिवलचे’ उद्घाटन केल्यावर केंद्रीय मंत्र्यांनी भद्रवाहचे वर्णन भारताच्या जांभळ्या क्रांतीची जन्मभूमी असे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर प्रवाहापासून तुटलेल्या देशातील प्रदेशाला विकासाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये सामील करण्यावर जोर दिला होता आणि केवळ त्यांच्या या प्रगतीशील विचारांमुळेच आज भद्रवाह येथे देशातील पहिला लव्हेंडर महोत्सव आयोजित करणे शक्य झाल्याचे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की देशातील प्रत्येक नागरिकाला रोजगार देणे विकसित देशांसह कुठल्याही देशाला शक्य नाही. मात्र विद्यमान सरकार ‘स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया’ अंतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करत आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘जांभळ्या क्रांती’ अंतर्गत स्टार्ट अप्स, ही ‘स्टार्ट अप इंडिया आणि स्टॅन्ड अप इंडिया’ अंतर्गत असलेल्या संधींपैकी एक संधी असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
लव्हेंडरच्या लागवडीने जम्मू आणि काश्मीरच्या दुर्गम भागातल्या अंदाजे 5,000 शेतकरी आणि तरुण उद्योजकांना रोजगार दिला असून 1,000 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंब 200 एकरपेक्षा जास्त परिसरात लव्हेंडरची लागवड करत आहेत.