
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच रेपो रेट आणि CRR मध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे एकीकडे कर्ज महागले आहे तर दुसरीकडे फिक्स्ड डिपॉझिट्स करणाऱ्या गुंतवणूकदारांची दिवाळी झाली आहे.
यामागील कारण असे कि, जवळपास सर्वच बँकांनी आपल्या FD वरील व्याजदरात केली आहे.
बँकांनी यावर्षी जानेवारीपासूनच एफडीचे व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता मे महिन्यात यामध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. तसेच, येत्या काही महिन्यांत यामधील व्याजदरात आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. जर तुम्हांलाही FD करायची असेल तर त्याविषयीच्या काही गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
वास्तविक, याआधी ज्या ग्राहकांनी मॅच्युरिटीनंतर FD मधून पैसे काढलेले नाहीत त्यांना बँकाकडून FD च्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज मिळते. यामुळे गुंतवणूकदारांनी जास्त व्याज मिळवण्यासाठी मॅच्युरिटीनंतरही पैसे काढले नाहीत. RBI ने आता यावर बंदी घालताना नवा नियम लागू केला आहे. RBI चे हे नवीन नियम सर्व व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमध्ये केलेल्या FD ना सारखेच लागू झाले आहेत.