
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा :दि. 2.अभिनव कला बहुउद्देशीय मंच नांदुरा आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शेतकरी पुत्र अभ्यासिका नांदुरा येथे 1जून 2022 रोजी संपन्न झाला . या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणुन नांदुरा तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री राहुलजी तायडे ,अजयभाऊ घनोकार ,राजेशजी गावंडे,शिवाजी महाराज झामरे,रवीजी ठाकूर सर,अभिनव कला मंच चें अध्यक्ष बंडू भाऊ अंबुस्कर ,वामनराव भगत सर,परीक्षक वामनराव फंड,प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट काव्यलेखनाला पुरस्कार देण्यात आले, यामध्ये गुलाब दौलू मेश्राम अमरावती, डॉ सदानंद इंगोले नांदेड, स्वप्नील मधाडे, हिवरा आश्रम यांच्या काव्याला अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले तसेच उत्तेजनार्थ बक्षिसामध्ये सारंग फाळके ,श्रीकृष्ण चोपडे, निलेश रामराव देशमुख नांदुरा यांना पारितोषिके*मिळाली .
डॉ.बाबसाहेब आंबेडकरांचे मानव उत्क्रांती चे विचार जगाच्या पाठीवर जनमानसात रुजावे आणि त्यांच्या महान कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरती एकूण पाच हजार काव्याचे महाकाव्य ‘ असे पाच खंडात प्रसिद्ध होणार आहे या महाकाव्यात या काव्य लेखन स्पर्धेतील सर्व कवींच्या कविता प्रसिद्ध होणार आहेत. एक समृद्ध समाज , सुशिक्षित तरुण आणि परिपुर्ण विकसीत देश निर्माण करण्यासाठी युवकांनी महामानवांचे विचार आत्मसात करावे असे अभ्यासिकेतील मुलांना तहसीलदार साहेबांनी यावेळी मार्गदर्शन केले आणि एक ‘ समतेचे महाकाव्य’अभिनव कला मंच ला त्यांनी यावेळी भेट दिले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अभिनव चे वामनराव भगत सर म्हणाले की ,काव्यातून भाव प्रगट होतात आणि भावपुर्ण शब्दांना जर स्वर संगत लाभली तर ते काव्य मानवी मनाला अंतर्मुख व्हायला लावते .नांदुरा नगर परिषद चे मा नगरसेवक अजयभाऊ घनोकार यांनी सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .
यावेळी विशेष उपस्थिती लाभलेले अभिनव कला मंच चे सदस्य शिवव्याख्याते शिवाजी महाराज झामरे यांनी आपले विचार ओघवत्या शैलीत मांडतांना , ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून अन्यायाविरुद्ध लढून एक सशक्त समाज उभा केला त्याप्रकारचे विचार आजच्या नवंयुवकांनी आत्मसात करावे आणि अश्या प्रकारचे काव्य लेखन स्पर्धांमुळे युवकांचे विचार हे प्रगल्भ होत जातात.कवी वामनराव फंड यांनीसुद्धा आपल्या काव्य शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि काव्य स्वरूपात जगातील वास्तव जनतेसमोर नेमके आणि अचूक शब्दात मांडता येते यांचे महत्व पटवून दिले. वामनराव राव रायपुरे यांनी यावेळी आजच्या युवकांना शाहू ,फुले, आंबेडकर यांच्या विचारांची गरज असून अन्याया विरिद्ध लढा असा संदेश दिला ,तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा यावेळी मनोगते व्यक्त केली .सर्व विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर सर्वांचेच भारदस्त विचार एकूण मंत्रमुग्ध झाले होते .या बहारदार कार्यक्रमाचे लयबद्ध सूत्रसंचलन चित्रपट अभिनेते मोहन काळे यांनी केले आणिआभारप्रदर्शन गीतकार लहुजी ठाकरे यांनी केले यावेळी अभिनव कला मंच चे सर्व पदाधिकारी लक्ष्मण वक्ते गणेश भाऊ नायसे,मोहन कुलकर्णी, विजय डामरे ,स्वप्नील भगत,प्रकाश काळे,चेतन पाटील,आणि अभ्यासिकेचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.