
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – प्रशासकीय नियमावली नुसार निवेदन दिले पाठपुरावा केला जिल्हा अधिकारी कार्यालय खनिज विभागाने दोनदा कारवाईचे आदेश देऊन सुद्धा
दिवशी शिवारातील गट क्र ६१ ६२ गायरान जमीनीवरील अवैध उत्खनन दिवसा ढवळ्या असताना, गंगापूर तहसीलदार पाहणी करून सुद्धा
कोणतेही कारवाई करत नसल्यामुळे तसेच तहसील कार्यालयातील भोंगळ कारभाराला वैतागून दि ६ जुन २०२२ रोजी तहसील कार्यालय गंगापूर समोर “नागडे व्हा” आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन पिंपळगाव दिवशी नागरिकांच्या वतीने इंजी महेशभाई गुजर यांनी दिले आहे
*प्रमुख मागण्या*
१)पिंपळगाव, दिवशी शिवारात सुरू असलेले सर्व गौण खनिज उत्खनन कायमची बंद करावी. उत्खनन झालेल्या जागेचा पंचनामे करून पांढरा रंग देऊन भविष्यात उत्खनन होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच उत्खनन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
२) पिंपळगाव-देवपुडी-कसाबखेडा शिवरस्ता तात्काळ मोकळा करून द्यावा
३) शासकीय जमीन गट क्र ७९ व गट क्र १ पिंपळगाव व गट क्र १ दिवशी वर असलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे तसेच पिंपळगाव दिवशी शिवारात शासकीय जमीनी भाडेपट्ट्याने प्रधान केलेल्या असतील त्यांच्या दर्शनी भागावर अधिकृत फलक लावण्यात यावे.
४) दिलिप बिल्डकाॅन खोदकाम केलेल्या खदानीचा सविस्तर पंचनामा करून अतिरिक्त उत्खनन केल्या बाबत दंडात्मक कारवाई करावी
५) अवैध खदानी मुळे दिवशी शिवारातुन येणारा ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आला आहे. तो पुर्वत करून पिंपळगाव पाझर तलावात सोडावा.
६) नविन मतदार नोंदणी करतांना निवडणक आयोगाने ठरवुन दिलेल्या नियमाचे उल्लंघन झाल्याची तक्रार दिली होती त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निवेदन पिंपळगाव दिवशी उपसरपंच ज्ञानेश्वर वर्णे, पंकज नन्नवरे, शिवबा संघटनेचे देविदास पाठे,राष्ट्रवादीचे वाल्मीक सिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपत रोडगे तसेच सामाजिक कार्यकर्ते इंजी महेशभाई गुजर यांच्या उपस्थितीत तहसीलदार गंगापूर सतिश सोनी साहेब गैरहजर असल्याने नायब तहसीलदार अविनाश अंकुश यांना देण्यात आले आहे.
वरिल सर्व प्रकरणे गेली ६ महिन्यापासून प्रलंबित आहे त्यामुळे तहसील गंगापूर कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाहीत असाच अर्थ निघत असल्याने नाइलाजाने “नागडे व्हा” आंदोलन करावे लागत आहे