
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
वझरगा येथे दि.०१ जुन रोजी राजमाता, महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.मुरहरी कुंभारगावे, ॲड. प्रशांत कोकणे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जि.प.शिक्षण व क्रीडा समिती स्विकृत सदस्य मा.बस्वराज पाटील वन्नाळीकर, शिवाजी पाटील वन्नाळीकर, सरपंच संजय औरादे, ,मा.सभापती भगवान जालने, मा.सरपंच तथा रासप तालुका अध्यक्ष नागनाथ कोकणे, उत्तमराव पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष माधव कोकणे, बालाजी कोकणे आदि मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात वझरगा नगरीचे विशेष वैभव असलेल्या महाराष्ट्रातील एकमेव अद्वितीय अश्वरूढ अहिल्यादेवीच्या शिल्पाचे व प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून झाली. मान्यवरांचा सत्कारानंतर प्रा.डाॅ.गोविंद पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रतिनिधीक मनोगत नागनाथ कोकणे यांनी मांडले. प्रमुख अतिथी म्हणून बस्वराज पाटील व शिवाजी पाटील वन्नाळीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर प्रा.मुरहरी कुंभरगावे आणि अँड प्रशांत कोकणे यांनी अहिल्यादेवींच्या विचार आणि कार्याचा अतिशय अमोघ अशा वैचारिक वक्तृत्वाने अंतर्मुख करणारा धांडोळा घेतला. तर अध्यक्षीय समारोप करताना महेश पाटील यांनी गावाशी, समाजाशी, माणसाशी असलेले ऋणानुबंध आणि अहिल्यादेवींचे अफाट कार्य आणि त्यांच्याप्रती असणारी निष्ठा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचलन श्री.ज्ञानेश्वर सुर्यवंशी तर आभार व्यंकटेश पाटील यांनी मांडले.
या जयंती उत्सव कार्यक्रमानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळी भव्य मिरवणूक व मोटारसायकल रॅली, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी व्याख्यान तर रात्री वाघ्या-मुरळीचे जागरण आशा विविध कार्यक्रमांची मेजवानीच समग्र दिवसभर चालू होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे शिवाजी सुर्यवंशी, दत्ता कोकणे, माणिक सुर्यवंशी, ज्ञानेश्वर कोकणे, व्यंकटेश पाटील, विठ्ठल कोकणे, रामेश्वर कोकणे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, मधुकर कोकणे, दत्ता बाबळे, संतोष कोकणे, बळवंत सुर्यवंशी,साईनाथ कोकणे आदि सदस्य आणि गावातील सन्माननीय बाबाराव सुर्यवंशी, रामचंद्र कोकणे, रमेश सुर्यवंशी, दत्ता जालने, लक्ष्मण सुर्यवंशी, वसंत सुर्यवंशी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व लहान थोरांनी अथक परिश्रम घेतले. म्हणूनच कार्यक्रमाला गावातील व पंचक्रोशीतील असंख्य तरुण, महिला नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. एकंदरीत जन्मोत्सवाचा कार्यक्रम अतिशय देखणा, थाटात, उत्साहात व आनंदात संपन्न झाला आहे.