
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कोठेकर योगिता या पुण्यातील निगडी येथे शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभागात कार्यरत अत्यंत शिस्तप्रिय तंत्रस्नेही व विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत, त्यांना आनंददायी अध्यापना बरोबरच निबंध, भाषण लेख कविता याची आवड आहे .परंतु शालेय जीवनात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, लग्नानंतर त्यांनी स्वतःचा घर, संसार सांभाळत शिक्षण सुरु ठेवले बी एड व एम एड करतांना त्यांच्या लेखणीला खरे प्रोत्साहन मिळाले . कॉलेजच्या पुस्तकात लेख, स्वरचित कविता प्रकाशित झाल्या अन् तेथूनच साहित्यप्रवासाला सुरुवात झाली . आणि खरी साहित्याची आवड निर्माण झाली . त्यांच्या कवितांनाही संमेलनात नावाजले गेले.आणि आपली एक नवी ओळख या क्षेत्रात निर्माण केली .
भारतात कोरोना आजार आला, आणि सगळ जग थांबलं..पण त्याही परिस्थितीवर मात करत त्यांनी आपले शैक्षणिक व साहित्यीक कार्य चालू ठेवले या कार्यानेच त्यांना जगण्याचे बळ दिले . मानसिक आधार दिला . यातच हिरकणी समुहाच्या वनमाला पाटील यांनी सांगितलेली कल्पना त्यांना आवडली आणि लिहिलेल्या कविता एकत्रित करून ” मनातल्या कविता” हा काव्यसंग्रह तयार झाला वनमाला ताईनी या कार्यात बरीचसी मदत केली आणि या पुस्तकाची नोंद *महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड* मध्ये झाली.
याचे श्रेय साहित्यिक पाटील मॅडम यांना जाते कारण त्यांच्यामुळेच हे यश मिळू शकले आणि असेच यश साहित्यासाठी प्रेरित करत असते . त्यामुळे कोठेकर योगिता यांचं लेखन अखंड चालू आहे, अशीच साहित्यिक पुस्तके श्रोत्यांच्या मेजवानीसाठी त्या आणणारच आहे, त्यांच्या कार्याला अनेक सारस्वत शुभेच्छा देत आहेत आणि त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे…