
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी- सुशिल वडोदे
सिल्लोड:समाजात जुन्या काळापासून चालत आलेल्या अनिष्ट विधवा प्रथेच्या निर्मूलनासाठी सिल्लोड तालुक्यातील वरखेडी भायगाव येथील ग्रुपग्रामपंचायतीने ठराव पारित केला आहे. नुकत्याच झालेल्या ग्राम सभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, या सर्व जुन्या अनिष्ट प्रथांना कायमची मूठमाती देणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.
याप्रसंगी ग्रामसेवक किशोर गव्हाणे, ग्रा. पं. सदस्य मंजीतराव फलके, स्वाती भागवत, दैवशाला फलके, सरपंच मनिषा पाटील, ज्योती पाटील, ज्ञानेश्वर भगत, नीलेश भागवत, सखाहारी फलके यांच्यासह गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.