
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलढाणा: दि.६., बहुजन समाज पार्टी बुलढाणा यांची बैठक शासकीय विश्रांम गृह येथे दि.५/६/२०२२ रोजी पार पडली. त्यात बैठकी मध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे यांनी जिल्हाध्यक्ष ॲड.डी.एम भगत यांच्या उपस्थितीत मध्ये मलकापूर येथील धिरज इंगळे यांची जिल्हा प्रभारी पदी निवड करण्यात आली. त्याप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.